Pardeep Narwal Sakal
क्रीडा

अबतक 1200 पाॅइंट्स! प्रदीप नरवालनं घातली विक्रमाला गवसणी

सुशांत जाधव

Pro Kabaddi League, PKL 2021 : प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील 20 वा सामना यूपी योद्धा (UP Yoddha) आणि गुजरात जायएंट्स (Gujarat Giants) यांच्यात रंगला होता. दोन्ही संघातील थरारक सामना सरशेवटी 32-32 बरोबरीत सुटला. यंदाच्या हंगामातील तिसरा सामना टाय झाल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही संघातील लढतीत प्रदीप नरवालने दमदार खेळ करुन आपल्यातील क्षमतेचा नजराणा दाखवून दिला. 11 पॉइंट्स मिळवत त्याने सुपर 10 ला गवसणी घातली.

या सुपर टेनसह एक खास विक्रम प्रदीप नरवालने (Pardeep Narwal) आपल्या नावे केला. प्रो कबड्डीच्या इतिहासात सर्वाधिक 1200 पॉइंट्स त्याच्या नावे जमा झाले आहेत. त्याने यादरम्यान 61 वेळा सुपर टेन करण्याचा पराक्रमही करुन दाखवला आहे.

पहिल्या हाफमध्ये गुजरातच्या संघाने 20-14 अशी आघाडी घेतली होती. सुरुवातीला यूपी योद्धाचा संघ कमी वेळात ऑल आउटच्या उंबरठ्यावर दिसत होता. पण सुरिंदर गिलने दोन गुण कमावत सामन्यात ट्विस्ट आणले. त्यानंतर यूपी योद्धानं राकेशला सुपरटैकलच्या माध्यमातून बाद केले. लढतीच्या 9 व्या मिनिटाला गुजरातने यूपी योद्धा संघाला ऑल आउट केले. यूपीचा संघ दुसऱ्यांदा ऑल आउटच्या छायेत आला होता. पण डिफेंडर्संनी सुपर टैकलच्या माध्यमातून प्रदीप नरवालला मैदानात आणले. पुन्हा मैदानात येतात प्रदीपनं गुण मिळवूनही दिले.

यूपी याद्धाने दुसऱ्या हाफमध्ये करो वा मरोच्या रेडमध्ये अजय कुमारला बाद केले. त्यानंतर प्रदीप नरवालने करो वा मरोच्या रेडमध्ये गुणांची कमाई केली. 24 व्या मिनिटाला यूपीनं गुजरातला ऑल आउट केले. प्रदीप नरवालशिवाय गुजरातच्या ताफ्यातील राकेश नरवालनेही सुपर 10 ला गवसणी घातली. अखेर रंगतदार सामना 32-32 असा बरोबरीत सुटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! 3 दिवसांत 56,000 रुपयांनी स्वस्त! 24K, 22K आणि 18K सोनं कितीला? चांदीही नीचांकी पातळीवर

Sangli District Bank Election : दुष्काळाचा 'ड्रामा' अन् सग्यासोयऱ्यांचा 'हंगामा'; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील 'या' पॅटर्नची राज्यभर चर्चा

IND vs NZ 2nd T20I: इशान किशनला नेमकं काय झालं? दुसऱ्या सामन्यातून घेतली माघार, आता मालिकेला मुकणार? BCCI ने दिले अपडेट्स

Marathi News Live Updates: आधी कारने धडक दिली, रस्त्यावर पडताच लोखंडी रॉडने चेहऱ्यावर वार करत मित्रानेच केला बंटी दीक्षितचा निर्घृण खून

Central Railway: कल्याण-कसारा विशेष ब्लॉकचा प्रवाशांना फटका! लोकलसह एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावणार; पाहा नवे वेळापत्रक

SCROLL FOR NEXT