Pro Kabaddi Twitter
क्रीडा

PKL 2021 : दिल्लीची दबंगगिरी! नवीन एक्सप्रेसचा 'सुपर 10 चौका'

सुशांत जाधव

प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामातील दबंग दिल्ली (Dabang Delhi) आणि बंगाल वॉरियर्स (Bengal Warriors) यांच्यातील लढत एकतर्फी झाली. दिल्लीच्या संघाने हा सामना एकहाती जिंकला. दिल्लीचा स्टार रेडर नवीन कुमारने (NaveenKumar) यंदाच्या हंगामात चौथा सुपर 10 चा पराक्रम करुन दाखवला. यंदाच्या हंगामात गुणतालिकेत अव्वल असलेल्या दिल्लीनं सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. त्यांनी पहिल्या हाफमध्ये बंगालच्या संघाला दोन वेळा ऑल आउट केले.

युवा रेडर नवीन कुमारच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर दबंग दिल्ली संघाने पहिल्या हाफमध्ये 33-15 अशी मोठी आघाडी घेतली. दिल्लीच्या बचावपट्टूनं बंगालचा स्टार रेडर मनिंदर सिंहला पहिल्या हाफमध्ये केवळ तीनच पॉइंट्स दिले. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी सातत्याने गुण मिळवले. पण पहिल्या हाफमधील खेळाच्या जोरावर दिल्लीने सामना 52-35 असा खिशात घातला.

नवीन कुमारनं कमावले सर्वाधिक पॉइंट्स

युवा रेडर नवीन कुमारने सातत्याने 25 वेळा सुपर-10 करण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. त्याने बंगाल वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात 24 पॉइंट्सची कमाई केली. त्याचा सहकारी विजयने त्याला उत्तम साथ दिली. त्याने 10 पॉइंट्स कमावले. दुसऱ्या बाजूला बंगालकडून मनिंदरने दुसऱ्या हाफमध्ये दमदार खेळ दाखवला. त्याने 16 पॉइंट्सची कमाई केली. बंगालच्या सुकेश हेगडे यानं 9 पॉइंट्स घेतले. अवघ्या 1 गुणाने त्याची सुपर टेनची संधी हुकली.

दबंग दिल्ली संघाने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यातील 3 सामने जिंकले आहेत. एक सामना त्यांनी अनिर्णित राखला आहे. अपराजित दिल्लीच्या खात्यात 18 गुण असून ते गुणतालिकेत सर्वात टॉपला आहेत. दुसऱ्या बाजूला बंगाल वॉरियर्सचा संघा 4 सामन्यातील 2 विजय आणि 2 पराभवासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यांच्या खात्यात 11 पॉइंट्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सहमतीने झालेल्या शारीरिक संबंधांना छळ मानले जाऊ शकत नाही, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय

Navi Mumbai: नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! नवी मुंबईत २ दिवस वाहतुकीत बदल; काही रस्ते बंद, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Latest Marathi News Live Update : परभणीतील मिर्झापूरमध्ये आरोग्य शिबिरातील गोळ्या खाऊन तब्येत बिघडली

Danger Tribe : जगातला सगळ्यात भयानक समुदाय, इथले लोक स्वतःच्या आई-वडिलांच्या मृत शरीराला कच्चे खातात

Ajit Pawar Plane Accident: विमान अपघाताची सखोल चौकशी हवी; राष्ट्रवादीची भूमिका सुनिल तटकरे यांचे बारामतीत प्रतिपादन..

SCROLL FOR NEXT