Rafael Nadal and Iga Swiatek  PTI
क्रीडा

Italian Open : नदाल-इगाचा जलवा!

महिला एकेरीमध्ये फ्रेंच ओपनची सम्राज्ञी इगा श्वीऑनटेकने कॅरोलिना प्लिस्कोवाला एकहाती पराभूत करत स्पर्धा जिंकली.

सुशांत जाधव

Italian Open : इटालियन ओपन 2021 च्या फायनलमध्ये स्पेनच्या राफेल नदालने जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या नोवाक जोकोविचला पराभूत केले. टेनिसच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या जोकोविच आणि नदाल यांच्यात रविवारी रंगतदार लढत पाहायला मिळाली. नदालने 7-5, 1-6, 6-3 असा विजय नोंदवला. पहिल्या दोन सेटमध्ये दोघांच्यात 'काँटे की टक्कर' पाहायला मिळाली. निर्णायक सामन्यात दमदार खेळ करुन नदालने बाजी मारली.

नदालने पहिला सेट 7-5 असा जिंकला. त्यानंतर नंबर वन जोकोविचने दुसऱ्या सेटमध्ये दमदार कमबॅक केले. 6-1 असा हा सेंट जिंकून त्याने 1-1 बरोबरी केली. नदालने निर्णायक सेट आपल्या नावे करत इटालियन ओपनच्या ट्रॉफीवर नाव कोरले. महिला एकेरीमध्ये फ्रेंच ओपनची सम्राज्ञी इगा श्वीऑनटेकने कॅरोलिना प्लिस्कोवाला एकहाती पराभूत करत स्पर्धा जिंकली. पोलंडच्या 19 वर्षीय खेळाडूने 2019 ला इटालियन ओपनचे चॅम्पियन राहिलेल्या प्लिस्कोवाचा खेळ 46 मिनटांत खल्लास केला. तिने 6-0, 6-0 असा एकतर्फी विजय नोंदवला.

पराभवामुळे निराश आहे. पण जिंकण्यासाठी माझ्या लेव्हलवर खेळलो, असे जोकोविचने सामन्यानंतर म्हटले आहे. पाचवेळा रोमचा कोर्ट गाजवणाऱ्या जोकोविचने सामना गमावला असला तरी तो नदालच्या एक पाउल पुढेच आहे. दोघांच्यातील आतापर्यंत झालेल्या सामन्यात तो 29-28 अशा आघाडीवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Raj Thackeray : गणेशोत्सवात दंगलींचा कट? ‘मुंबईत झलक दिसली’; राज ठाकरेंचा खळबळजनक इशारा

Vaibhav Sooryavanshi ची फटकेबाजी पाहून तिलक वर्मा वैतागला; १५ वर्षाच्या पोराला उगाच भिडला, अम्पायरची पळापळ... Video

Pune Bengaluru Highway: कारला आग लागली अन् महामार्ग ठप्प; आनेवाडीजवळ ५ किमी वाहनांच्या रांगा, अग्निशामक वाहनावर संताप

Marathi News Live Updates : चिंचवड सब स्टेशन इथं ट्रान्सफर्मरला आग, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडीसह रावेतमध्ये विजपुरवठा खंडित

वयाच्या १५व्या वर्षी आई, १७व्या वर्षी वडील गेले... दोनदा बारावीची परीक्षा दिलेल्या पूजाने KBC मध्ये जिंकले १२.५ लाख, अमिताभही अवाक्

SCROLL FOR NEXT