Joe Root Ashes Series esakal
क्रीडा

Joe Root Ashes 2023 : राजस्थान रॉयल्स आज खुश तो बहुत होगे तुम... रूटने कसोटीत केली 'टी 20' खेळी

अनिरुद्ध संकपाळ

Joe Root Ashes Series : इंग्लंडच्या ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटीत इंग्लंडने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. पहिल्या डावात अवघ्या 8 धावांची आघाडी घेणाऱ्या कांगारूंना आता विजयासाठी 370 धावांच्या प्लसचे टार्गेट चेस करावे लागणार आहे. इंग्लंडला या मजबूत स्थितीत जो रूटने पोहचवले.

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या जो रूटने या कसोटीत टी 20 स्टाईलनेच फलंदाजी केली. त्याने 42 धावात 60 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर त्याने 106 चेंडूत 91 धावांची खेळी केली. मात्र मर्फीने त्याचा त्रिफळा उडवला त्यामुळे त्याचे शतक अवघ्या 9 धावांनी हुकले. दुसऱ्या बाजूने जॉनी बेअरस्टोने 78 धावांची आक्रमक खेळी करत चांगली साथ दिली.

जो रूटने इयान बेलशी केली बरोबरी

जो रूटने पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करत इयान बेलशी बरोबरी साधली. अॅशेसमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक अर्धशतकी खेळी करणाऱ्यांच्या यादीत आता रूट आणि बेल हे प्रत्येकी 22 अर्धशतके ठोकत बरोबरीत आले आहेत. इंग्लंडकडून अॅशेसमध्ये सर्वाधिक अर्धशतके ही जॅक हॉब्स यांनी केली आहेत. त्यांनी 27 अर्धशतकी खेळी केल्या आहेत.

एलिस्टर कूकशी बरोबरी

जो रूटने इंग्लंडकडून सर्वाधिक अर्धशतकी खेळी करणाऱ्यांच्या यादीत आता संयुक्तरित्या अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 90 वेळा अर्धशतकी खेळी करण्याची करामत करून दाखवली. याचबरोबर त्याने एलिस्टर कूकशी बरोबरी साधली.

या यादीत 68 अर्धशतकी खेळी करत इयान बेल दुसऱ्या स्थानावर आहे. तर ग्रॅहेम गूच यांनी 66 अर्धशतकी खेळी करत तिसरे तर जेफ्री बॉयकॉट यांनी 64 अर्धशतकी खेळी करत चौथे स्थान पटकावले आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT