Ranji Trophy 2024 esakal
क्रीडा

Ranji Trophy 2024 : 54 चेंडूतील तब्बल 53 चेंडू निर्धाव! रणजी ट्रॉफीत विदर्भच्या पोट्ट्याने केला मोठा धमाका

Ranji Trophy 2024 : संघ म्हणून विदर्भचा वेगळाच थाट पहायला मिळाला

अनिरुद्ध संकपाळ

Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफी 2024 च्या हंगामातील सामन्यांचा दुसरा राऊंड सुरू झाला आहे. पहिल्या दोन सामन्यात अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. मात्र संघ म्हणून विदर्भचा वेगळाच थाट पहायला मिळाला. विदर्भ रणजी हंगामातील पहिला सामना सर्व्हिसेसविरूद्ध खेळला. हा सामना जिंकल्यानंतर आता ते दुसऱ्या सामन्यात मणिपूरशी दोन हात करत आहेत.

शुक्रवारी विदर्भाने मणिपूरचा पहिल्या डावात 75 धावात खुर्दा उडवला. यापूर्वी विदर्भने पहिल्या डावात 230 धावा केल्या होत्या. विदर्भसाठी अष्टपैलू खेळाडू आदित्य सरवटे याने धडाकेबाज कामगिरी केली. त्याने 69 धावा केल्याच याचबरोबर गोलंदाजीतही त्याने धमाका करत 6 धावात 4 बळी टिपले. आदित्य सरवटेने 9 षटके टाकली होती. त्यातील 53 चेंडू निर्धाव टाकले. त्याच्याविरूद्ध मणिपूरच्या फलंदाजांना फक्त एक शॉट खेळता आला.

फक्त बिकाश सिंहने त्याच्या विरूद्ध धाव काढळी. त्याने देखील आदित्यच्या एकाच चेंडूवर षटकार मारला. नाही तर आदित्यच्या गोलंदाजीवर एकही धाव झाली नसती. सरवटेनेच बिकाश सिंहला बाद केलं. पहिल्या डावात आदित्य सरवटेबरोबरच आदित्य ठाकरेने देखील दमदार गोलंदाजी करत मणिपूरचा निम्मा संघ गारद केला.

सरवटेने दुसऱ्या डावात देखील दमदार गोलंदाजी करत 10 धावात मणिपूरचा निम्मा संघ गारद केला. मणिपूरने दुसऱ्या डावात देखील शंभरच्या आत गाशा गुंडाळला. पहिल्या डावात 75 धावा करणारे मणिपूर दुसऱ्या डावात 65 धावात ढेर झाले. विदर्भाने एक डाव आणि 90 धावांनी सामना जिंकला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

Latest Marathi News Live Update: विजेच्या प्रश्नासाठी ग्रामस्थांनी काढला महावितरण कार्यालयावर दिंडी मोर्चा

SCROLL FOR NEXT