SA vs IND 1st Test  esakal
क्रीडा

SA vs IND 1st Test : रवी शास्त्रींच्या कर्णधाराला कानपिचक्या; रोहितने पहिल्या अर्ध्या तासात केली मोठी चूक?

पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने भारतीय गोलंदाजांचा चांगलीच धुलाई केली

अनिरुद्ध संकपाळ

SA vs IND 1st Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनवर होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी दमदार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

डीन एल्गरने दमदार शतकी खेळी करत डेव्हिड बेडिंगहम सोबत 131 आणि मार्को येनसेन सोबत 111 धावांची शतकी भागीदारी रचली. या भागीदारींच्या जोरावर आफ्रिकेने पहिल्या डावात 350 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. भारताने गोलंदाजी करताना पहिल्यांदा चांगला मारा करत आफ्रिकेची अवस्था 3 बाद 113 धावा अशी केली होती. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांना विकेट घेणे जमले नाही.

यावरून रवी शास्त्री यांनी कर्णधार रोहित शर्माच्या रणनितीवर टीका केली. स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना लंचनंतर भारतीय संघाने मोठी चूक केली असं सांगितलं. शास्त्री म्हणाले, 'ही गोष्ट अशी आहे ज्याच्यावर प्रशिक्षक असताना आम्ही खूप चर्चा केली आहे. कायम आम्ही आमच्या सर्वश्रेष्ठ दोन गोलंदाजांनी सत्राची सुरूवात केली आहे. जुम्ही मागे वळून पाहिलं तर भारताने लंचनंतर पहिल्या अर्ध्या तासात एक मोठी चूक केली. ज्या दोन गोलंदाजांद्वारे सुरूवात केली ती एक मोठी चूक होती.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : भारतीय संघाने टॉस जिंकला, सूर्याने अचंबित करणारा निर्णय घेतला; प्रेक्षकांमध्ये थोड्यावेळासाठी सन्नाटा...

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

Viral Video : 'स्वतः कर्णधारपद सोडणार की PCB हकालपट्टी करणार?' पाकिस्तानी पत्रकाराचा थेट प्रश्न, सलमान अली आघा म्हणाला...

Mumbai News: घरेलू कामगारांचा सरकारला अल्टिमेटम, अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतुदीची करावी; नेमक्या मागण्या काय?

T20 WC, SA vs ZIM: दक्षिण आफ्रिकेचा सलग सातवा विजय... उपांत्य फेरीत न्यूझीलंडला भिडणार; दुसऱ्या Semi मध्ये इंग्लंड विरुद्ध....

SCROLL FOR NEXT