Jadeja-Siraj-Jarvo-Video
Jadeja-Siraj-Jarvo-Video 
क्रीडा

"जाडेजाने मला एक प्रश्न विचारला अन् त्यामुळे सिराज हसू लागला"

विराज भागवत

टीम इंडियाची जर्सी घालून आलेल्या जार्वोने सांगितला धमाल किस्सा

Ind vs Eng 2nd Test: भारताच्या गोलंदाजांनी लॉर्ड्सवर भेदक मारा केला. त्यामुळे टीम इंडियाला १५१ धावांनी धडाकेबाज विजय मिळाला. शेवटच्या दिवशी शमी-बुमराह जोडीने आधी इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीपुढे गुडघे टेकले. २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव केवळ १२० धावांत आटोपला. या सामन्यात चौथ्या दिवशी चहापानाच्या नंतर जार्वो नावाचा एक तरूण भारताची जर्सी घालून आला. त्याच्याशी भारतीय खेळाडूंनी नक्की काय संवाद साधला आणि कशामुळे सिराजला इतकं हसू आलं याबद्दल त्या चाहत्यानेच खुलासा केला.

टीम इंडियाची जर्सी घालून मैदानावर आलेला जार्वो याचं खरं जार्विस असं आहे. तो सुरूवातीला विराट कोहलीचा खूप मोठा फॅन होता, पण आता तो सिराजचा फॅन झाला आहे असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं. जार्वो सध्या दुबईत राहतो. इंडियन स्पोर्ट्स फॅन्सला दिलेल्या मुलाखतीत जार्वोने एक धमाल किस्सा सांगितला. "मी जेव्हा मैदानात गेलो तेव्हा मी पंचांना सांगायचा प्रयत्न करत होतो की मी भारताचा खेळाडू आहे. माझी जर्सी बघा. त्यावेळी जाडेजा हळूच माझ्याजवळ आला आणि त्याने मला विचारलं की तू कोणत्या एण्डने गोलंदाजी करणार आहेस? जाडेजाचा तो प्रश्न ऐकून सिराजला हसू अनावर झालं", असा किस्सा मैदानावर घडल्याचे जार्वोने सांगितलं.

जार्वो पुढे म्हणाला, "मी अंपायर्सना समजावून सांगत होतो की माझी जर्सी बघा. मी त्या लोकांशी थोडी गंमत करत होतो. आता पुढेही अशी मजा मी पुन्हा कधीतरी करणारच आहे. फक्त आता कधीतरी मी ही गंंमत भारतात येऊन भारताच्या स्टेडियममध्ये करणार आहे."

जार्वोने चौथ्या दिवशी मैदानात येऊन काही काळ साऱ्यांचेच मनोरंजन केले. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने कोणलाही इजा केली नव्हती. तसेच, तो कोणाशीही मिठी, गळाभेट घेण्यास गेला नाही. त्यामुळे जार्वोवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT