क्रीडा

Ravindra Jadeja : टीम इंडियासाठी दिलासा! जडेजा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला..

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja Injury Update : भारत आशिया कपमध्ये आपली अस्तित्वाची लढाई लढत असताना भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने त्याच्या दुखापतीबाबत अपडेट दिली. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीत आपल्या गुडघ्याच्या दुखापतीवषयी चाहत्यांना माहिती दिली. रविंद्र जडेजा आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहितो की, 'माझ्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मला अनेक लोकांचे आभार मानायचे आहेत. बीसीसीआय, माझे संघ सहकारी, सहाय्यक स्टाफ, फिजिओ, डॉक्टर आणि चाहते यांचे आभार मानतो. मी दुखापतीतून सावरण्यासाठी त्वरित प्रयत्न करणार आहे. मी मैदानावर परतण्यासाठी उत्सुक आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार.'

रविंद्र जडेजाला आशिया कपमध्ये हाँगकाँग विरूद्धच्या सामन्यावेळी दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आशिया कपमधून माघार घ्यावी लागली. बीसीसीआयने त्याच्या जागी अक्षर पटेलला रिप्लेसमेंट म्हणून पाठवले. दरम्यान, जडेजा वर्ल्डकपला देखील मुकणार असे वृत्त आले होते. मात्र संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आताच याबाबत कोणताही निर्णय होणार नाही. अजून वर्ल्डकपला सहा ते सात आठवडे अवकाश आहे असे वक्तव्य केले होते.

दरम्यान, बीसीसीआयने भारताचा आजारी वेगवान गोलंदाज आवेश खान यांच्या बदली दीपक चहरला आशिया कप खेळण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आले. हे वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT