Ravindra Jadeja  esakal
क्रीडा

Ravindra Jadeja : कसोटीत 490 विकेट्स घेणाऱ्या दिग्गज खेळाडूला डच्चू; रोहित संघात करणार दोन बदल?

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja : भारताचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटीत डावाने पराभव झाला. यानंतर संघावर टीका होत आहे. रोहित शर्माच्या रणनिती आणि संघ निवडीबाबतही बोललं जात आहे. पहिल्या कसोटीत भारताने फिरकीपटू म्हणून रविचंद्रन अश्विनला संधी दिली होती. रविंद्र जडेजाला दुखापत झाल्यामुळे तो पहिला सामना खेळू शकला नाही. आता रविंद्र जडेजा दुसऱ्या सामन्यासाठी फिट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पहिल्या कसोटीपूर्वी रविंद्र जडेजाला पाठीची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पहिल्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली. आता तो दुसऱ्या कसोटी सामन्यात प्लेईंग 11 मध्ये दिसण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला. आफ्रिकी तोफखाण्यासमोर भारताची भंबेरी उडाली होती.

रविंद्र जडेजा खेळणार दुसरा कसोटी सामना?

India.com ने दिलेल्या वृत्तानुसार रविंद्र जडेजा 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत खेळणार आहे. पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाने वॉर्म अप केलं. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. पीटीआने दिलेल्या माहितीनुसार जडेजाने 30 ते 40 मीटर स्प्रिंट मारली. याचबरोबर त्याने काही फिटनेस ड्रील देखील केले. तिसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात त्याने सहभाग देखील घेतला होता.

भारताला आजूनही दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. पहिल्या कसोटीत पराभव झाल्याने याहीवेळी भारताची इतिहास बदलण्याची संधी वाया गेली आहे. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गरने 185 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. कगिसो रबाडाने पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. तर मार्को येनसेनने 83 धावांच्या खेळीसह दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेऊन अष्टपैलू कामगिरी केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT