Ravindra Jadeja Ranji Trophy  esakal
क्रीडा

Ravindra Jadeja : सुरूवात फ्लॉप केलेल्या रविंद्र जडेजाने टाकला 'सत्ता', रोहित शर्मा झाला निश्चिंत

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja Ranji Trophy : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाच्या फिटनेसबाबत निवडसमितीच्या मनात शंका होती. त्यामुळेच निवडसमितीने जडेजाची ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड केली मात्र त्याला फिटनेस सिद्ध करण्यासाठी रणजी ट्रॉफी खेळण्यास सांगितले.

रविंद्र जडेजा रणजी ट्रॉफीच्या सौराष्ट्र विरूद्ध तमिळनाडूच्या सामन्यात सौराष्ट्रचा कर्णधार म्हणून खेळू लागला. मात्र गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेल्या रविंद्र जडेजाला सामन्याच्या पहिल्या दिवशी 17 षटके टाकूनही एकही विकेट मिळवता आली नाही. त्यावेळी जडेजाला आपली कामगिरी उंचवाण्यासाठी वेळ लागेल असे वाटते होते.

मात्र सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जुना रविंद्र जडेजा पहायला मिळाला. जडेजाने दुसऱ्या डावात 17. 1 षटकात 53 धावात 7 विकेट्स घेतल्या. जडेजाच्या या जबरदस्त स्पेलमुळे तमिळनाडूचा दुसरा डाव 36.1 षटकात 133 धावांमध्ये संपुष्टात आला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर तमिळनाडूने पहिल्या डावात 342 धावा केल्या होत्या. त्यानंतर सौराष्ट्रचा पहिला डाव 192 धावात संपला. तमिळनाडूने 132 धावांची आघाडी घेतली होती. मात्र सौराष्ट्रने दुसऱ्या डावात तमिळनाडूला 133 धावात गुंडाळले. जडेजाने 7 विकेट्स घेतल्या. आता सौराष्ट्रसमोर विजयासाठी 266 धावांचे आव्हान आहे. दिवसचा खेळ संपला त्यावेळी सौराष्ट्रने 1 बाद 4 धावा केल्या होत्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरोग्यमंत्र्यांच्या शेजारच्या जिल्ह्यात चाललंय काय? उपचाराचं बिल मंजुरीसाठी लाच, अधीक्षकाला अटक

Google वर सर्च केल्याने सुद्धा हॅक होऊ शकते तुमची सिस्टीम, कसं सुरक्षित राहायचं? पाहा सोपी पद्धत

IPL 2026: धोनीचं लखनौचं तिकीट झालंय बूक! LSG विरुद्ध मैदानात दिसण्याची शक्यता, पण कोणाच्या जागेवर खेळणार?

Beed News: बीडचा बार्शी रोड की मौत का कुआ?; पुलावरून कार खड्ड्यात कोसळता कोसळता वाचली

Gangadharpant Kuchan Passes Away: विणकररत्न, माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचे निधन; २३ सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत योगदान, शरद पवारांच्या भेटीचा काय आहे किस्सा..

SCROLL FOR NEXT