RCB Mike Hesson esakal
क्रीडा

RCB Mike Hesson : आरसीबी सोडण्याचं दुःख, प्रगती केली तरी... माईक हेसनची भावनिक पोस्ट व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

RCB Mike Hesson : रॉयल चॅलेंजर बेंगलोरने शुक्रवारी अनुभवी अँडी फ्लॉवरची संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. याचबरोबर आरसीबीचे क्रिकेट ऑपरेशन्स डायरेक्टर माईक हेसन आणि मुख्य प्रशिक्षक संजय बांगर यांची आरसीबीमधील कारकीर्द संपली.

माईक हेसन आणि संजय बांगर यांचा आरसीबीसोबतचा करार हा सप्टेंबरला संपणार होता. आरसीबीने हा करार वाढवण्याबाबत उत्सुकता दाखवली नाही. यानंतर माईक हेसन यांनी इन्स्टाग्रामवर आरसीबी फॅन्ससाठी एक पोस्ट लिहीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. (RCB Mike Hesson Instagram post)

माईक हेसन यांनी आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये आरसीबी आयपीएल टायटल जिंकू शकली नाही याबाबत निराश असल्याचे म्हटले. माईक हेसन लिहितात, 'जरी आम्ही गेल्या 4 हंगामात 3 वेळा प्ले ऑफ गाठण्याची कामगिरी करत प्रगती दाखवली. तरी आम्ही ती ट्रॉफी उंचावण्यात अपयशी ठरलो.' (RCB Coach News)

'अनेक खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि चाहत्यांप्रमाणे माला देखील ती ट्रॉफी उंचावणे आवडले असते. आरसीबी सोडणे हे निराशाजनक असलं तरी मैदानात आणि मैदानाबाहेर काही दिग्गज लोकांसोबत काम करतानाच्या काही चांगल्या आठवणी मी माझ्या सोबत घेऊन जात आहे.'

माईक हेसन पुढे म्हणाले की, 'मी आरसीबीच्या व्यवस्थापनाचे मला संधी दिल्याबद्दल आभार मानतो. याचबरोबर नव्या प्रशिक्षकांना शुभेच्छा देतो. सर्वात शेवटी आरसीबीचे भन्नाट फॅन्स, तुम्ही संघाला दिलेलं प्रेम आणि खंबीर साथ पाहून मला कायम मी माझ्या घरातच असल्यासारखं वाटलं. त्याबद्दल तुमचे आभार.'

आरसीबीचे नवे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर हा आरसीबीशी जोडले जाण्यापूर्वी लखनौ सुपर जायंट्सला मार्गदर्शन करत होते. त्याने लखनौला पाठोपाठच्या दोन हंगामात प्ले ऑफ पर्यंत पोहचवले. त्याने यापूर्वी पंजाब किंग्जला देखील मार्गदर्शन केले आहे.

अँडी फ्लॉवर आरसीबी जॉईन केल्यानंतर म्हणाला की, 'आरसीबीशी जोडले जाणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माईक हेसन आणि संजय बांगर यांनी आरसीबीसाठी घेतलेल्या कष्टाची मला जाणीव आहे. मी त्यांचा आदर करतो. मी आरसीबीला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे चॅलेंज स्विकारतो.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon In Goa Konkan : मॉन्सून गोवा, कोकण किनारपट्टीवर दाखल? राज्यात ४ दिवस वादळी पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

राज्यसभेसाठी छगन भुजबळांचा पत्ता कट? जागेसाठी राष्ट्रवादीत नव्या 'या' ४ नावांची चर्चा; महायुतीचा '१२-३-२' फॉर्म्युला काय?

Mumbai Indians: रोहित शर्मा RR विरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? जयवर्धनेने दिले अपडेट्स, संघाच्या अपयशाचं कारणही सांगितलं

ICC New Rule: चेंडूचा रंग बदलणार, गौतम गंभीर ड्रिंक्स ब्रेकमध्ये टीमला रणनीती सांगायला येणार; क्रिकेटमध्ये नव्या बदलाचे संकेत

Petrol-Diesel Price: GST लागू झाल्यास पेट्रोल-डिझेल किती स्वस्त होऊ शकतं? जाणून घ्या धक्कादायक गणित

SCROLL FOR NEXT