Robin Uthappa blessed with a baby girl esakal
क्रीडा

CSK चा 'हा' खेळाडू दुसऱ्यांदा बनला बाप; इंस्टावर शेअर केली खास पोस्ट

रॉबिनच्या पत्नी शीतल उथप्पाने एका चिमुकलीला जन्म दिला आहे.

धनश्री ओतारी

टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि चेन्नईच्या खेळाडू असलेल्या रॉबिन उथप्पाला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. रॉबिनच्या पत्नी शीतल उथप्पाने एका चिमुकलीला जन्म दिला आहे. रॉबिनने खास फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंद व्यक्त केला.(Robin Uthappa blessed with a baby girl)

रॉबिन उथप्पाने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये चिमुकलीसह त्याचा ५ वर्षाचा मुलगा आणि पत्नी शीतलही दिसत आहे. विशेष म्हणजेज उथप्पाने चिमुकलीचे स्वागत करताना तिचे नावही आपल्या चाहत्यांसोबत जाहीर केले. त्याने आपल्या मुलीचे नाव ट्रिनिटी उथप्पा असे ठेवले आहे. त्याच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

रॉबिन उथप्पा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या पत्नीचा बेबी बंप फोटोशुट शेअर केला होता.

रॉबिन उथप्पाने भारतासाठी 46 एकदिवसीय आणि 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये जवळपास २६ च्या सरासरीने एकूण ९३४ धावा केल्या आहेत, तर टी-२० मध्ये त्याच्या नावावर २४९ धावा आहेत.

आयपीएल 2022 मध्ये, चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असलेल्या रॉबिन उथप्पाने 12 सामन्यांच्या 11 डावांमध्ये 2 अर्धशतकांसह 134.50 च्या स्ट्राइक रेटने एकूण 230 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Budget 2026 : पीएमपी तिकिटात ज्येष्ठांना ५०% सवलत, महिलांसाठी खास योजना; पुणे महानगरपालिकेचा १५ हजार ६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

गौतमीच्या गळ्यात 'कोणाच्या' नावाची साखळी, नेटकऱ्यांनी काढलं शोधून, म्हणाले...'आयुष्यात कोणाची एन्ट्र्री झाली की...'

Latest Marathi News Live Update : दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत मोर्चा

Numerology : 'या' 5 मुलांकाचे लोक कटकारस्थान करून बिघडतात दुसऱ्याचं आयुष्य, समोर चांगले वागून सोयऱ्यांच्याच पाठीत खुपसतात खंजीर

Yoga For Travel: लांब फ्लाइटमध्ये थकवा आणि अंगदुखी त्रास देतायत? मग ५ मिनिटांचा ‘इन-फ्लाइट योगा’ नक्की ट्राय करा!

SCROLL FOR NEXT