IND vs AUS Rohit Sharma esakal
क्रीडा

Rohit Sharma IND vs AUS : पाकिस्तानातील लोकं म्हणत होती म्हणून... रोहितने दिलं भन्नाट उत्तर

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS Rohit Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या तीनही कसोटी तीन दिवसांच्या आत संपल्या. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 9 विकेट्स राखून पराभव केला. यामुळे मालिकेची स्थिती आता 2 - 1 अशी झाली आहे. मालिकाचा निकाल हा अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीवर अवलंबून असणार आहे.

दरम्यान, तिसऱ्या कसोटीत भारताने पहिल्या डावात 109 तर दुसऱ्या डावात 163 धावा केल्या. भारताचे फलंदाज इंदूर कसोटीत फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर कांगारूंच्या फिरकीचा सामना करू शकले नाहीत. यानंतर तिसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीबाबत देखील बरीच चर्चा सुरू झाली. भारतातील कसोटी सामने आता 5 दिवसापर्यंत जात नाहीत असा नाराजीचा सूर देखील लावण्यात आला.

भारताचा कर्णधार रोहित शर्माला देखील सामना झाल्यानंतर याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रोहित शर्माने पाकिस्तानचा अँगल घेत भन्नाट उत्तर दिले. रोहित शर्मा म्हणाला की, 'कसोटी सामने हे भारताबाहेर देखील पाच दिवस चालत नाहीयेत. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामना देखील तीन दिवसात संपुष्टात आला. पाकिस्तानमध्ये लोकं म्हणत होती की खूप कंटाळवणे कसोटी सामने झाले. त्यामुळे आम्ही त्यांना आता रंजक बनवले.'

रोहित शर्माने इंदूर कसोटीतील खेळपट्टीबद्दल आपले मत व्यक्त केले. त्याने इंदूर कसोटीच्या खेळपट्टीबद्दलचा प्रश्न धुडकावून लावला. तो म्हणाला की, खेळपट्टीबद्दल बोलण्यापेक्षा चर्चा ही उस्मान ख्वाजा आणि चेतेश्वर पुजाराच्या झुंजार खेळीची झाली पाहिजे. याचबरोबर नॅथन लायनच्या जबरदस्त गोलंदाजीची चर्चा झाली पाहिजे.

(Sports Latest News)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT