क्रीडा

रोहितचं त्रिशतक! सचिन-सेहवाग बरोबर घेतलं जाणार नाव, पाकविरुद्ध मैदानात पाऊल ठेवताचं रचला इतिहास

श्रीलंकेतील कोलंबो शहरातील आर प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या शानदार सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने मैदानात उतरताच इतिहास रचला आहे.

Manoj Bhalerao

Rohit Sharma Triple Century:टीम इंडियाचा कर्णधार आणि स्टार सलामीवीर रोहित शर्माने रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात इतिहास रचला आहे. श्रीलंकेतील कोलंबो शहरातील आर प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या शानदार सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने मैदानात उतरताच इतिहास रचला आहे. स्टार सलामीवीर रोहित शर्माने या सामन्यात प्रवेश करत आपल्या नावावर मोठी कामगिरी केली आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने अनोखे त्रिशतक ठोकले आहे. खरे तर रोहित शर्माने सलामीवीर म्हणून 300 आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण केले आहेत. श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील आर प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्धच्या महान सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने मैदानात उतरताच हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या विक्रमासह रोहित शर्माने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांच्या खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

सचिन तेंडूलकरने भारतासाठी ३४६ सामन्यामध्ये सलामीवीराची भूमिका बजावली आहे. विरेंद्र सेहवागने ३२१ सामन्यांमध्ये भारताला विस्फोटक सुरुवात करुन दिली. त्यानंतर रोहित शर्माने पाकिस्तान विरुद्ध ३००व्या सामन्यात सलामीसाठी उतरत या खास क्लबमध्ये प्रवेश केला.

सध्या भारत आणि पाकिस्तान या संघांदरम्यान आशिया चषकातील सुपर-४ सामना खेळवला जातोय. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतासाठी सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताला शतकीय सुरुवात करुन देत पाकिस्तानी गोलंदाजांचा घाम काढला. मात्र, संघाची धावसंख्या शंभराच्या वर गेल्यावर दोन्ही सलामीवीरांना तंबूत जावं लागलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT