Rohit Sharma Rahul Dravid  esakal
क्रीडा

Rohit Sharma Rahul Dravid : द्रविडनं 2022 च्या वर्ल्डकपनंतर.... रोहितनं सांगितलं द्रविडनं संघाला कसं सावरलं

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Rahul Dravid : भारताचा कर्णधार रोहित शर्मा वर्ल्डकप 2023 च्या फायनलपूर्वी आज पत्रकार परिषदेला समोरा गेला. या पत्रकार परिषदेवेळी रोहित शर्माने प्रशिक्षक राहुल द्रविडचे तोंडभरून कौतुक केलं. त्यांचा भारताच्या या देदिप्यमान कामगिरीत मोलाचा वाटा असल्याचं देखील तो सांगायला विसरला नाही.

रोहित शर्मा म्हणाला, 'राहुल द्रविडची भुमिका ही फार मोठी आहे. त्यांनी प्रत्येक खेळाडूला त्याची संघात काय भुमिका आहे हे स्पष्टपणे सांगितले. त्याने सर्व खेळाडूंना स्वातंत्र्य आणि मुक्तता दिली. तो खेळाडूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला. 2022 च्या वर्ल्डकपनंतर त्याने खेळाडूंना भक्कम पाठिंबा दिला. या गोष्टी त्याच्याबद्दल सर्व काही सांगून जातात.'

रोहित पुढे म्हणाले की, 'मी राहुल भाईने संघात जे वातावरण तयार केलं आहे ते पाहून खूप खूश आहे. खेळाडूंनी देखील त्यांना चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी कधी बाहेर कोण काय बोलतंय आणि अमुक सामन्यात किती धावा झाल्या याचा विचार केला नाही.'

रोहित शर्मा 2011 च्या वर्ल्डकपबाबत देखील बोलला. तो म्हणाला, '2011 च्या वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्याने मी भावूक झालो होते. मात्र आताच्या घडीला खूप खूश आहे.'

'मी भारतीय संघाचे वर्ल्डकप फायनलमध्ये नेतृत्व करेन असं कधी वाटलं नव्हत. मात्र तुम्ही जी इच्छा व्यक्त केली होती ती झाली. मी फक्त संघात माझी चांगली जागा निर्माण करू इच्छित होतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अघोरी पूजेसाठी महिलाही शोधायच्या सावज; १६ संशयितांना नोटीस, चंद्रपूरमधील प्रकार, 'सकाळ'ने उघडकीस आणलं प्रकरण

Narasimha Jayanti 2026 : श्रद्धा, धैर्य आणि न्यायाचं प्रतीक असलेली नृसिंह जयंती; जाणून घ्या तारीख, कथा आणि साजरी करण्याची पद्धत

Latest Marathi News Live Update : सांगलीत आईच्या खूनप्रकरणी मुलाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

Beed News: पशुसंवर्धन योजनांची मोठी पुनर्रचना; नव्या स्वरूपात मिळणार जनावरांसाठी लाभ; जिल्ह्यातील पशुपालकांना; डीबीटीद्वारे थेट अनुदान

Marathwada News: जायकवाडी धरणावर बाष्पीभवनाचे संकट; तापमान वाढीच्या इशाऱ्याने पाण्याची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT