Rohit Sharma CWC 23  esakal
क्रीडा

Rohit Sharma CWC 23 : माझ्या आधी विराट अन् धोनी... उशिरा कर्णधारपद मिळाल्याबद्दल रोहित काय म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma CWC 23 : भारतात होणाऱ्या 13 व्या वनडे वर्ल्डकपला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. वर्ल्डकप भारतात होत असल्याने भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भारताने 2013 पासून कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. याचबरोबर 2011 नंतर भारताने वनडे वर्ल्डकपही जिंकलेला नाही.

रोहित शर्मा यंदाच्यावर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्माने वर्ल्डकपला सामोरे जाण्यापूर्वी आपल्या कॅप्टन्सीबाबत भाष्य केले. त्याने महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीच्या कॅप्टन्सीबाबत देखील वक्तव्य केलं.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत रोहित म्हणतो, एखाद्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व हातात मिळण्याचं योग्य वय हे 26 ते 27 वर्षं असतं. मात्र प्रत्येकाला जे हवं असतं ते मिळतंच असं नाही.

'नक्कीच तुम्हाला 26 - 27 व्या वर्षी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाण्यासाठी तुम्ही यशाच्या शिखरावर असणे गरजेचे असते. तुम्ही भारतीय संघाच्या कर्णधारपदाबाबत बोलत आहात. तेथे अनेक दिग्गज आहेत. संघात अनेक खेळाडू आहेत जे कर्णधारपद सांभाळू शकतात. मला माझ्या संधीसाठी वाट पहावी लागली आणि ते योग्यच होतं. माझ्या आधी विराट कोहली आणि एमएस धोनी कर्णधार होते.'

रोहित पुढे म्हणाला की, 'ज्या खेळाडूंना कर्णधारपद मिळालं नाही त्यांची नावं एकदा वाचा, गौतम गंभीर विरेंद्र सेहवाग... ते सर्व भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहेत. तुम्ही युवराज सिंगला देखील विसरू शकत नाही. त्यांना भारताचे नेतृत्व करण्याची संधी कधी मिळाली नाही.

युवराज हा भारताचा मॅच विनर होता. त्यानं भारताचं नेतृत्व करायला हवं होतं. मात्र त्याला संधी मिळाली नाही, हेच आयुष्य असतं. मला ही संधी आता मिळाली आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी असं म्हणेन की जेव्हा मला संघाचं नेतृत्व कसं करायचं असतं हे समजलं त्यानंतर भारतीय संघाची धुरा माझ्या खांद्यावर आली. मला नेतृत्व कसं करायचं हे काहीच माहिती नसताना कॅप्टन्सी माझ्याकडे आली नाही. हे एका दृष्टीने चांगलेच झाले.'

'एका संघाला वर्ल्डकपमध्ये जवळपास 11 सामने खेळायचे आहेत मग तो संघ अंतिम फेरीत दाखल होईल. आम्ही गेल्यावेळी 2019 मध्ये अशा प्रकारे खेळलो होतो. मात्र दीड महिन्यात 11 वनडे सामने खेळणे सोपे नाही. हा खूप मोठा वर्ल्डकप आहे. आम्ही आमचा कोणताही वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त होऊ नये याची काळजी घेत आहेत. त्यामुळेच आम्ही गरजेपेक्षा जास्त वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT