Rohit Sharma Lamborghini Urus esakal
क्रीडा

Rohit Sharma : मुंबईच्या रस्त्यावर रोहितच्या लॅम्बोर्गिनीचा स्वॅग, रितीकासोबतचा Video व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Lamborghini Urus : भारतीय संघ वेस्ट इंडीजमध्ये 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळत असताना कर्णधार रोहित शर्मा सध्या विश्रांती घेत आहे. वनडे मालिका झाल्यानंतर रोहित शर्मा युनायटेड स्टेट्समध्ये आपल्या व्यावसायिक कामासाठी गेला होता. त्यानंतर तो मुंबईत परतला असून त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका हे मुंबईच्या रस्त्यावर लॅम्बोर्गिनी राईडचा आस्वाद घेताना दिसले. या लॅम्बोर्गिनी उरूची किंमत जवळपास 4.2 कोटी रूपये इतकी आहे. (Rohit Sharma luxury Car Collection)

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईत त्याची लॅम्बोर्गिनी चालवताना दिसला. त्याच्यासोबत त्याची पत्नी रितीका देखील होती. हे दोघेही एका स्पोर्ट्स वेअर शोरूमच्या बाहेर गाडीतून उतरले. यावेळी त्यांच्याभोवती चाहते आणि फोटोग्राफर्सची गर्दी जमा झाली होती.

रोहित शर्माने ही लॅम्बोर्गिनी उरू एसयूव्ही गेल्या वर्षी मार्च महिन्यात घेतली होती. लॅम्बोर्गिनी उरू ही त्याच्या ड्युअर टोन कॉन्फिग्रेशनसाठी ओळखली जाते. ही चेरी रेड आणि नेरो ब्लॅक कॅबिनसह येते. रोहित शर्माने निळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी खरेदी केली आहे. हा निळा रंग टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघाचा ब्रँड कलर आहे. रोहित शर्मा सध्या दोन्ही संघांचे नेतृत्व करत आहे.

रोहित शर्माच्या ताफ्यात लॅम्बोर्गिनीसोबतच बीएमडब्लू M5 देखील आहे. त्यात देखील निळ्या रंगाची छडा आहे. लॅम्बॉर्गिनी उरू ही आधुनिक एसयुव्ही गाड्यांमध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. भारतात ही लँच होताच त्याला चांगलं यश मिळालं आहे. भारतात या गाडीच्या विक्रीचा आलेख चढताच आहे. या आलिशान गाडीचे आतापर्यंत 100 पेक्षा जास्त युनिट भारतात विकले गेले आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT