South Africa Vs India 1st Test marathi news 
क्रीडा

SA vs IND : दक्षिण आफ्रिकेकडून पराभवानंतर भारताला आणखी एक धक्का! ICC ने घेतली मोठी ॲक्शन

India vs South Africa News in Marathi | भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हरला अन्

Kiran Mahanavar

South Africa Vs India 1st Test : भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हरला आहे. यजमानांनी सेंच्युरियनमध्ये एक डाव आणि 32 धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर भारताला आणखी एक धक्का बसला आहे. ICC ने स्लो ओव्हर रेटमुळे मोठी ॲक्शन घेतली आणि दंड ठोठावला.

सेंच्युरियन कसोटीत भारताला आवश्यक ओव्हर रेट राखण्यात अपयश आले. त्यामुळे आयसीसीने दंड म्हणून भारतीय संघाला मॅच फीच्या 10 टक्के दंडही ठोठावला आहे. आयसीसीने जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, भारत लक्ष्यापेक्षा दोन षटके कमी पडल्याने ही ॲक्शन घेतली.(India vs South Africa News in Marathi)

काय आहे आयसीसीचा नियम?

ICC आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड ठोठावला जातो. हा नियम किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे.

सेंच्युरियन कसोटीत काय झाले?

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 408 धावा केल्या. आफ्रिकन संघाकडे पहिल्या डावात 163 धावांची आघाडी होती. भारत दुसऱ्या डावात 131 धावांत सर्वबाद झाला. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.(India vs South Africa News in Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT