क्रीडा

Shubman Gill : 'पुढच्या सामन्यात धावा केल्या नाहीत तर...', दिग्गज खेळाडूने गिलला दिला इशारा

Kiran Mahanavar

Dinesh Karthik Questions on Shubman Gill : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिलने मर्यादित षटकांमध्ये स्वत:ला सिद्ध केले असले तरी कसोटीत तो संघर्ष करताना दिसत आहे. सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात गिलला केवळ 28 धावा करता आल्या होत्या.

आता भारताचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने गिलच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत धावा करणाऱ्या सरफराज खानचेही कौतुक केले आहे.

शुभमन गिलची कामगिरी पाहून दिनेश कार्तिक म्हणाला की, 'शुबमन गिलवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गिल आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. 20 कसोटी सामने खेळल्यानंतर तो 30 च्या सरासरीने धावा करत आहे. पण, पुढच्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली नाही तर त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.

दिनेश कार्तिकने पुढे सरफराज खानचा उल्लेख केला जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. सरफराजने आतापर्यंत 42 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 70.98 च्या सरासरीने 3691 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 13 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. आता निवडकर्त्यांनी पुढे जाऊन सरफराज खान आणि रजत पाटीदारसारख्या खेळाडूंना संधी द्यायला हवी, असे कार्तिकचे मत आहे.

शुभमन गिलने आजपर्यंत 19 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याची सरासरी 31 आहे आणि त्याने 58.9 च्या स्ट्राइक रेटने 994 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 2 शतके झळकावली आहेत. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 44 सामन्यांमध्ये 61.4 च्या दुप्पट सरासरीने 2271 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT