Sachin tendulkar esakal
क्रीडा

Sachin tendulkar : भेटायचं आहे, तुझ्या नावाची जर्सी हवी... मास्टर ब्लास्टर 34 वर्षाच्या 'या' काश्मिरी क्रिकेटपटूचा झाला फॅन

अनिरुद्ध संकपाळ

Sachin tendulkar : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जम्मू काश्मीरच्या बिजबेहरा जिल्ह्यातील वाघमा गावातील 34 वर्षाचा क्रिकेटपटूचा फॅन झाला आहे. आमिर हुसैन लोन असं या दिव्यांग क्रिकेटपटूचं नाव आहे तो सध्या जम्मू काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवत आहे.

सचिन त्याच्या क्रिकेटवरील प्रेमामुळे प्रभावित झाला असून त्याला भेटण्याची इच्छा सचिन तेंडुलकरने व्यक्त केली आहे. आमिर हा दोन्ही हात नसतानाही क्रिकेट खेळतो. तो खांदा आणि चेहरा यामध्ये बॅट पकडून फलंदाजी करतोय. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सिचनने देखील या व्हिडिओची दखल घेत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा शेअर केला.

सचिन ट्विट करून म्हणाला, 'आमिरने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. मी हा व्हिडिओ पाहून भावूक झालो. त्याने क्रिकेटवर त्याचं किती प्रेम आहे हे दाखवून दिलं. मला आशा आहे की एक दिवस मी त्याला भेटेन आणि त्याच्या नावाची जर्सी घेईन. लाखो लोकांना खेळ खेळण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल तुझे अभिनंदन.'

आमिरचा वयाच्या आठव्या वर्षी अपघात झाला होता. आमिरने सांगितले की ज्यावेळी त्याने हात नसतानाही क्रिकेट खेळायला सुरूवात केली त्यावेळी सर्वांना धक्का बसला. तो म्हणाला की, 'मी 2013 आणि 2018 ला दिल्लीत राज्यस्तरीय स्पर्धा खेळलो. त्यानंतर मी बांगलादेशविरूद्ध आंतरराष्ट्रीय सामना देखील खेळलो.'

'मी त्यानंतर नेपाळ, दुबई आणि शारजाहमध्ये देखील पॅरा क्रिकेट खेळलोय. ज्यावेळी मी पायाने गोलंदाजी केली आणि खांदा मानेचा वापर करून फलंदाजी केली त्यावेळी सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मी देवाचा आभार मानतो की त्याने मला क्रिकेट खेळण्यासाठी बळ दिले.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT