Sachin Tendulkar esakal
क्रीडा

Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टरने ठोकल्या 168 च्या स्ट्राईक रेटने धावा; युवराजच्या संघाला दिली शेवटच्या षटकात मात

अनिरुद्ध संकपाळ

Sachin Tendulkar : भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग आज एकमेकांसमोर उभे ठाकले होते. श्रीय साई मधुसूदन साई ग्लोबल ह्युमॅनिटेरियन मिशनकडून एका मैत्रीपूर्ण सामन्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वन वर्ल्ड आणि वन फॅमली यांच्यात सामना रंगला होता.

या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या स्ट्राईक रेटचीच चर्चा रंगली. वयाच्या 50 व्या वर्षी खेळताना देखील आपल्या बॅटची धार अजून कमी झाली नसल्याचे दाखवून दिले. सचिन तेंडुलकरने 10 वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो अधून-मधून सामने खेळताना दिसतो.

दरम्यान, साई मधुसूदन साई ग्लोबल ह्युमॅनिटेरियन मिशनकडून एक सामना आयोजित करण्यात आला. हा सामना वन वर्ल्ड आणि वन फॅमली या दोन संघांदरम्यान झाला. यात सचिन तेंडुलकर, युवराज सिंग याच्यासह जगभरातील नावाजलेल्या क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदवला.

सामन्यात सचिन तेंडुलकरने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने 16 चेंडूत 27 धावा केल्या. या धावा त्याने 168.8 च्या स्ट्राईक रेटने केल्या. यात तीन चौकार आणि एका षटकाराचा देखील समावेश होता.

गोलंदाजीबाबत बोलायचं झालं तर सचिन तेंडुलकरने 2 षटकात 23 धावा देत 1 विकेट घेतली. त्याबरोबर सचिनने युवराज सिंगचा झेल देखील पकडला.

या सामन्यात सचिन तेंडुलकरच्या संघाने विजय मिळवला. तो या संघाचे नेतृत्व करत होता. तर वन फॅमली संघाचे नेतृत्व युवराज सिंगकडे होते. युवराजच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 181 धावा केल्या.

याच्या प्रत्युत्तरात खेळताना सचिनच्या संघाने हे आव्हान शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर पूर्ण केलं. ज्यावेळी सचिनच्या वन वर्ल्ड संघाला विजयासाठी 2 चेंडूत 3 धावांची गरज होती त्यावेळी इरफान पाठाणने मोठा भाऊ युसूफ पठाणच्या चेंडूवर षटकार मारत विजय मिळवला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT