Saif Ali Khan T10 Esakal
क्रीडा

Saif Ali Khan T10 : क्रिकेट रक्तातच! सैफ अन् करिनानं विकत घेतला ISPL मधील संघ

अनिरुद्ध संकपाळ

Saif Ali Khan T10 ISPL : बॉलीवूड स्टार सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांनी आज इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमधील संघ विकत घेतल्याची घोषणा केली. सैफ आणि करीना जोडीने कोलकाताचा संघ विकत घेतला आहे. या स्पर्धेच्या आयोजकांनी दावा केला आहे की ही भारताची पहिली टेनिस बॉल टी 10 क्रिकेट स्पर्धा असेल जी स्टेडियममध्ये खेळली जाईल.

करीना कपूरने आयएसपीएलमधील संघ विकत घेतल्याची घोषणा इन्स्टाग्रामवरून केली. तिने या पोस्टमध्ये लिहलं की, 'क्रिकेटची परंपरा आपण कायम जपतो. शेवटी हे आमच्या रक्तातच आहे. त्यामुळे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये टीम कोलकाता विकत घेतल्याचे जाहीर करताना आनंद होत आहे. युवा क्रिकेटपटूंना हे एक चांगलं व्यासपीठ असणार आहे. त्यांच्या प्रवासात सहभागी होण्यापेक्षा दुसरा चांगला आनंद नाही.'

दरम्यान, आयएसपीएल लीग आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं की, 'सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू होते आणि ते भारतीय संघाचे माजी कर्णधार देखील होते. पतौडी कुटुंबियांचे कोलकात्याशी देखील खास कनेक्शन आहे. सैफ अली खानची आई शर्मिला टागोर या देखील कोलकात्याच्या आहेत.'

आयएसपीएलमध्ये अनेक सेलिब्रेटींनी संघ विकत घेतले आहेत. अमिताभ बच्चनने मुंबई, अक्षय कुमारने श्रीनगर, ऋतिक रोशनने बंगळुरू, सूर्याने चेन्नई तर राम चरणने हैदराबाद संघ विकत घेतला आहे. आता त्यात सैफ अली खानची देखील भर पडली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic Jam : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; अडीच ते तीन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा, ट्रेलर बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा

२४ तास तुरुंगात राहिल्यानंतर कसं वाटलं? अभिजीत दीपकेंनी शेअर केला शाहरुख खानच्या चित्रपटातील सीन

Medical Courses Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीअखेर १० हजार ३९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : ग्राहक महिलेने लांबविले मंगळसूत्र श्रीरामपूर येथील घटना; पोलिसांत तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT