Sarfaraz Khan India A vs England Lion esakal
क्रीडा

Sarfaraz Khan : अजून काय करायचं...? नेटकऱ्यांनी निवडसमितीला घेतलं फैलावर

Sarfaraz Khan India A vs England Lion : भारत अ संघाकडून खेळत सरफराजने निवडसमितीला दिलं चोख प्रत्युत्तर

अनिरुद्ध संकपाळ

Sarfaraz Khan India A vs England Lion : भारत अ संघ आणि इंग्लंड लायन संघात दोन दिवसीय सामना होत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत इंग्लंडवर 175 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंड लायनचा डाव 233 धावात गुंडाळल्यानंतर भारताने दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात 6 बाद 416 धावांपर्यंत मजल मरली.

भारताकडून रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल आणि श्रीकार भारत यांनी चांगली फलंदाजी केली. रजत पाटीदारने शतकी खेळी केल्यानंतर सरफराज खान देखील शतक ठोकेल असे वाटत होते. मात्र तो 96 धावावर बाद झाला अन् अवघ्या 4 धावांनी त्याचं शतक हुकलं.

मात्र सरफराज खानच्या या धडाकेबाज खेळीनंतर सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होऊ लागला. नेटकऱ्यांनी निवडसमितीला फैलावर घेत सरफराजने अजून किती धावा करायच्या असा प्रश्न विचारला.

भारतीय निवडसमितीने नुकतेच इंग्लंड विरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात रजत पाटीदार आणि सरफराज खान दोघांचेही नाव नाहीये. तर श्रीकार भारत आणि ध्रुव जुरेल यांची दुसरा आणि तिसरा विकेटकिपर म्हणून संघात निवड झाली आहे.

सरफराज खान हा 2020 पासून भारतीय कसोटी संघाचं दार ठोठावत आहे. मात्र त्याला अजूनही कसोटी संघात स्थान मिळालेलं नाही. तो प्रत्येक रणजी हंगामात खोऱ्याने धावा करत आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंड लायनचा डाव 233 धावात गुंडाळला. भारताकडून मानव सुतारने तीन तर आकाश दीपने दोन विकेट्स घेतल्या. तर तुषार देशपांडे आणि पुलकीज नारंगने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

Shrigonda Drowning: पोहताना वडिलाचा मृत्यू,९ वर्षीय मुलगा बचावला; श्रीगोंदे तालुक्यातील घटना, युवकाने जीव धाेक्यात घातला,थरारक घटना!

Ahilyanagar Development: अहिल्यानगर करायचे महेश्‍वर! केंद्राकडे निधीची मागणी, पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे शहर विकासासाठी २००० कोटींचा प्रस्‍ताव..

SCROLL FOR NEXT