Novak Djokovic  AFP
क्रीडा

Wimbledon जोकोविचनं दहाव्यांदा गाठली सेमीफायनल!

जोकोविचने हंगेरीच्या बिगर मानांकित मार्टन फुकसोविच याला सरळ सेटमध्ये पराभूत केले.

सुशांत जाधव

लंडन : टेनिस जगतातील नंबर वन सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविचने बुधवारी सरळ सेटमध्ये विजय नोंदवत विम्बल्डनची सेमीफायनल गाठली. सहाव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद मिळवण्यासाठी तो सुसाट कामगिरी करताना दिसतोय. जोकोविचने सेंटर कोर्टवर झालेल्या सामन्यात हंगेरीच्या बिगर मानांकित मार्टन फुकसोविच याला 6-3, 6-4, 6-4 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. या विजयासह त्याने दहाव्यांदा विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. ग्रँडस्लॅम स्पर्धेत त्याने 41 वेळा अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे.

20 व्या ग्रँडस्लॅमला गवसणी घालून विक्रमाची बरोबरी करण्याच्या इराद्याने तो विम्बल्डनच्या कोर्टवर उतरला आहे. आतापर्यंत त्याने सहज विजय नोंदवत आपली स्पर्धेतील दावेदारी भक्कम केलीये. सर्बियाच्या 34 वर्षीय टेनिस स्टारने यंदाच्या हंगामात ग्रँडस्लॅम स्पर्धेत तब्बल 19 सामने जिंकले आहेत. त्याला कॅलेंडर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याची संधी देखील आहे. रॉड लीवर (1969) नंतर कोणत्याही पुरुष खेळाडूला हा पराक्रम करता आलेला नाही.

पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या क्वार्टर फायनलपर्यंत पोहचलेल्या फुकसोविच विरुद्ध जोकोविचने पहिल्या 18 मिनिटातच 5-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर जोकोविचने तीन गेम गमावल्यानंतर सेट आपल्या नावे केला. दुसरा आणि तिसरा सेट त्याने आरामात खिशात घातला. सेमीफायनलमध्ये जोकोविच 10 व्या मानांकित डेनिस शापोवालोव याच्या विरुद्ध खेळताना दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गासाठी कोल्हापुरात जमीन मोजणीचा आदेश आला, राजू शेट्टी, बंटी पाटलांची भूमिका काय?

LPG New Connection Update : नवीन एलपीजी कनेक्शनसाठी बुकिंग कधीपासून सुरू होणार? सरकारने स्पष्ट केली स्थिती

Satish Patil Death : ओव्हरटेक करताना काळाचा घाला! सांगली बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहायक सतीश पाटील अपघातात ठार; दुचाकीची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोराची धडक

Nepal Flood: नेपाळच्या महापुरात महाराष्ट्रातील ११० हून अधिक पर्यटक अडकले; मुंबईतील डॉक्टर दाम्पत्याशीही संपर्क तुटला..

Nigdi BSNL Duct: चुलत भावासमोरच दोघांचा गुदमरून मृत्यू; निगडी प्राधिकरणातील घटना, गर्भवती पत्नी अन् चिमुकल्या लेकरांना सोडून मनोजचा अंत..

SCROLL FOR NEXT