Shaheen Afridi VIDEO  esakal
क्रीडा

Shaheen Afridi VIDEO : Wd5, W, W, 1, 1, W, W... शाहीनचा एकाच षटकात धमाका; टीम इंडियाला इशारा

अनिरुद्ध संकपाळ

Shaheen Afridi VIDEO : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने टी 20 ब्लास्ट स्पर्धेत नॉटिंगहमशायर कडून खेळताना पहिल्याच षटकात मोठा धमका केला. त्याने पहिल्याच षटकात 4 विकेट्स घेतल्या. ट्रेंड ब्रिजमध्ये झालेल्या या सामन्याद्वारे शाहीन आफ्रिदीने एकप्रकारे भारतीय संघाला इशाराच दिला आहे.

भारतात 5 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष हे 15 ऑक्टोबरला होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याकडे आहे. त्यापूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने भारतीय संघाला एकप्रकारे इशाराच दिला.

शाहीन आफ्रिदीने टी 20 ब्लास्ट स्पर्धेत नॉटिंगहम विरूद्ध वारविकशायर सामन्यात डावाचे पहिलेच षटक टाकताना धमाका केला. या षटकाची शाहीन आफ्रिदीने पहिला चेंडू वाईड टाकला. या चेंडूवर बाईज चौकार गेल्याने फुकटच्या 5 धावा प्रतिस्पर्धी संघाला गेल्या. मात्र या 5 धावांचा वजावटा आफ्रिदीने पुढच्या 5 चेंडूत घेतला.

आफ्रिदीने पुढच्या दोन चेंडूवर दोन विकेट्स घेत वारविकशायरला खिंडार पाडले. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूवर प्रत्येकी 1 धाव दिली. त्यानंतर शाहीद आफ्रिदीने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट घेतली. आफ्रिदीने पहिल्या षटकात 7 धावांमध्ये 4 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT