Shikhar Dhawan World Cup 2023 Asian Games  esakal
क्रीडा

Shikhar Dhawan World Cup 2023 : शिखर धवनचे वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न भंगणार; BCCI घेणार मोठा निर्णय

अनिरुद्ध संकपाळ

Shikhar Dhawan World Cup 2023 Asian Games : भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन गेल्या काही काळापासून संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. मात्र त्याला मुख्य संघात स्थान मिळवता आलेले नाही. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जने नेतृत्व करणाऱ्या शिखर धवनचे आता मायदेशात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न देखील जवळपास भंगले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने सप्टेंबर महिन्यात चीन येथे होणाऱ्या एशियन गेम्ससाठी भारताचे पुरूष आणि महिला संघ पाठवणार आहे. भारताचा पुरूषांचा वरिष्ठ संघ हा त्यादरम्यान वनडे वर्ल्डकपची तयारी करत असेल. त्यामुळे एशियन गेम्ससाठी बीसीसीआय भारताचा दुय्यम संघ पाठवणार आहे. या दुय्यम संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत.

जर शिखर धवन एशियन गेम्ससाठी भारताच्या ज्युनियर संघाचे नेतृत्व करणार असेल तर संघ व्यवस्थापन त्याचा वर्ल्डकपसाठी विचार करत नाहीये हे स्पष्ट होते. त्यामुळे शिखर धवनचा अप्रत्यक्षरित्या वर्ल्डकप संघातून पत्ता कट झाला आहे. एशियन गेम्ससाठी संघ पाठवण्याबाबतचा निर्णय हा बीसीसीआयच्या 7 जुलैच्या अॅपेक्स काऊन्सीलच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

भारतीय संघात सध्या रोहित सोबत शुभमन गिल सलामी देतोय. त्याने गेल्या काही सामन्यात दमदार कामगिरी करत संघातील आपली जागा पक्की केली असून वर्ल्डकपसाठी देखील त्याचाच प्राधान्याने विचार केला जाईल. शिखर धवन सध्या एनसीएमध्ये आपल्या फिटनेसवर काम करत आहे.

एशियन गेम्स (Asian Games 2023)

- बीसीसीआय महिलांचा मुख्य तर पुरूषांचा 'ब' संघ या स्पर्धेसाठी पाठवणार आहे.

- भारतीय पुरूष संघाचे नेतृत्व हे शिखर धवन करेल तर संघाचे प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणून काम पाहतील.

- बीसीसीआयच्या अॅपेक्स काऊन्सीलची 7 जुलैला बैठक होणार आहे. त्यात याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT