क्रीडा

साखळी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा मेघालयवर विजय

साखळी क्रिकेट स्पर्धेत श्रद्धा पोखरकर आणि आरती केदारने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने मेघालय संघाचा आठ गडी राखून पराभव केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे तिरुअनंतपुरम, केरळ येथे सुरू असलेल्या वरिष्ठ महिला गटाच्या एकदिवसीय करंडक साखळी क्रिकेट स्पर्धेत श्रद्धा पोखरकर आणि आरती केदारने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने मेघालय संघाचा आठ गडी राखून पराभव केला.

केसीए मैदानावर शुक्रवारी झालेल्या लढतीत शंभर षटकांचा सामना केवळ २२.२ षटकांतच संपुष्टात आला. महाराष्ट्राने मेघालयाला ४८ धावांत गुंडाळले. मेघालयाच्या केवळ मोनिका लिंगडोहला (१८) दोन आकडी मजल मारता आली. श्रद्धा पोखरकरने अठरा धावा देईन पाच गडी बाद केले तिला आरती केदारने तीन तर अनुजा पाटीलने दोन गडी बाद करत सुरेख साथ दिली.

महाराष्ट्राने ६ षटकांतच विजयाला गवसणी घातली. महाराष्ट्रालाही दोन गडी गमवावे लागले. खुशी मुल्ला (२) आणि तेजल हसबनीस (०) लवकर बाद झाल्यावर दोन बाद पंधरा धावांवरून किरण नवगिरेने १८ चेंडूंत सहा चौकार व एक षटकारासह नाबाद ३८ धावा करताना महाराष्ट्राचा विजय साकार केला. नवगिरेला मुक्ता मगरेने सुरेख साथ दिली.

महाराष्ट्राचा हा तिसरा विजय असून त्यांचे बारा गुण झाले आहेत. त्यांचा पाचवा सामना रविवारी (ता. १४) गोवा संघाबरोबर होईल. धावफलक ः मेघालय - सर्वबाद ४८ (मोनिका लिंगडोह १८, श्रद्धा पोखरकर ५-१८, आरती केदार ३-१०, अनुजा पाटील २-६) पराभूत विरुद्ध महाराष्ट्र - २ बाद ४९ (किरण नवगिरे नाबाद ३८)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

'ठरलं तर मग' मालिकेतील दोन अभिनेत्यांचा मुंबई लोकलने प्रवास; आला असा अनुभव, म्हणाले- एका स्टेशनवर पोलीस...

Numerology Insights: पहिल्याच भेटीत जिंकतात सर्वांचे मन! 'या' ३ मूलांकांचे लोक मानले जातात खरे 'सोशल बटरफ्लाय'!

SCROLL FOR NEXT