Asia Cup 2023 Rohit Sharma 
क्रीडा

Ind vs Pak : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पुन्हा जखमी; रोहित शर्माचा खुलासा

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप-2023 चा सुपर-4 सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी बोलावले आहे.

टीम इंडियाचा प्लेइंग-11 समोर आला तेव्हा इशान किशन आणि केएल राहुल या दोघांची नावे होती, त्यापैकी एक बाहेर पडणार हे निश्चित मानले जात होते, पण श्रेयस अय्यर बाहेर झाला आहे. तेही शेवटच्या क्षणी. म्हणजे अय्यर खेळणार हे निश्चित होते पण अखेरच्या क्षणी तो संघातून बाहेर पडला.

रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध श्रेयस अय्यरच्या जागी केएल राहुलचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर या सामन्यात खेळणार नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर श्रेयस अय्यर नुकताच संघात परतला होता. मात्र तो पुन्हा एकदा जखमी झाला आहे. नाणेफेकच्या वेळेस रोहित शर्माने याचा खुलासा केला.

नाणेफेकीच्या वेळी रोहित म्हणाला, आम्हाही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार होतो. आम्ही आव्हानासाठी पूर्णपणे तयार आहोत. संघात दोन बदल आहेत, जसप्रीत बुमराह पुनरागमन करत आहे तर आम्हाला एक बदल करणे भाग पडले आहे. श्रेयस अय्यरला पाठीचा त्रास असल्याने त्याच्या जागी केएल राहुल खेळणार आहे.

अय्यर आणि राहुल या दोघांचाही भारताच्या वर्ल्ड कप संघात समावेश केला आहे, पण दुखापतीमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन केल्यानंतर त्यांच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गामुळे किंग कोब्रा, पट्टेरी वाघ, गवे, हत्ती, बिबट्यांना धोका, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीव्र विरोध, कसा असेल मार्ग

Breaking News Live Update: राहुरीत अपक्ष उमेदवाराचा सायकलवर प्रचार; सुजय विखेंचीही घेतली भेट

Pune Politics News: शरद पवारांचा लवकरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा दौरा; नव्याने पक्ष संघटना उभारणीसाठी देवदत्त निकम यांच्यासोबत चर्चा

Asha Bhosle Video : 'या' शाळेत झालं आहे आशा भोसले यांचं शिक्षण, स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितल्या होत्या कोल्हापूरच्या गोड आठवणी

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT