Ind vs Sa 1st Test Shubman Gill marathi news  
क्रीडा

IND vs SA : शुभमन गिलने स्वत:च्या पायावर मारून घेतली कुर्‍हाड, कसोटी करिअर होतय उद्ध्वस्त?

Kiran Mahanavar

Ind vs Sa 1st Test Shubman Gill : सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी उसळत्या खेळपट्टीवर शुभमन गिल पुन्हा एकदा फलंदाजीत फ्लॉप ठरला. केवळ 12 चेंडू खेळून शुभमन 2 धावा करून बाद झाला.

शुभमनने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सुरुवात केली, पण त्यानंतर त्याने स्वतःहून ठरवले की त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे. शुभमनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यापासून त्याचा फॉर्म खराब होत गेला.

यंदाच्या कसोटी क्रिकेटमध्ये शुभमन गिलची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. आणि कसोटी क्रिकेटमध्ये नंबर-3 फलंदाज म्हणून आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. शुभमन गिलला या वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यापासून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी देण्यात आली होती.

शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये नंबर-3 फलंदाज म्हणून आतापर्यंत 4 डाव खेळले आहेत. शुभमन गिलने या कालावधीत 6, 10, 29* आणि 2 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिलच्या अपयशानंतर आता भारतीय संघ व्यवस्थापनासमोर अनेक मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.

पण स्वत: गिलने संघ व्यवस्थापनाशी चर्चा करून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि हाच निर्णय त्याच्या करिअरसाठी कुठेतरी घातक ठरताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावातही तो केवळ 2 धावा करून बाद झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : नितेश राणे मुंब्रामध्ये दाखल

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT