Siddharth Sharma  Sakal
क्रीडा

Siddharth Sharma Demise : क्रिकेट प्रेमींसाठी वाईट बातमी! रणजी खेळाडूचे वयाच्या २८ व्या वर्षी निधन

सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देशातील क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Siddharth Sharma Demise : क्रिकेट जगतातून एक वाईट वृत्त समोर आले आहे. रणजी क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या वेगवान गोलंदाजाचे वयाच्या २८ वर्षी निधन झाले आहे.

हे ही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

सिध्दार्थ शर्मा असे निधन झालेल्या खेळाडूचे नाव आहे. सिध्दार्थ हिमाचल प्रदेशमधून रणजी सामने खेळत होता. सिद्धार्थच्या निधनानंतर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत दुःख व्यक्त केले आहे.

सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीने हिमाचलसह संपूर्ण देशातील क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

याबाबत हिमाचल क्रिकेट असोसिएशनचे सचिव अवनीश परमनर यांनी सांगितले की, गुरूवारी सिद्धार्थचे बडोद्यातील रूग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ व्हेंटिलेटरवर होता. सिद्धार्थ बडोद्याविरूद्धच्या शेवटच्या सामन्यात हिमाचलच्या संघात सहभागी झाला होता.

सिद्धार्थच्या निधनानंतर हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. सिद्धार्थचे अचानक जाणे हिमाचलचा विजय हजारे ट्रॉफी विजेता संघ आणि राज्याचा स्टार वेगवान गोलंदाज सिद्धार्थच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्याच्या जाण्याचे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना आणि चाहत्यांना मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना असे म्हणत त्यांनी श्रद्धांजली व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT