Singapore Badminton Open  eSakal
क्रीडा

Singapore Badminton Open: ट्रीसा-गायत्रीचा दिग्गजांना धक्का; सिंधू, प्रणोयचा पराभव

ट्रीसा जॉली- गायत्री गोपीचंद या भारताच्या महिला जोडीने गुरुवारी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद केली.

सकाळ वृत्तसेवा

सिंगापूर : ट्रीसा जॉली- गायत्री गोपीचंद या भारताच्या महिला जोडीने गुरुवारी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद केली. ट्रीसा-गायत्री जोडीने महिला दुहेरी विभागातील लढतीत बेक हा ना- ली सो ही या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियन जोडीला पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

दुहेरीत भारताला यश मिळाले असले तरी एकेरीत निराशेला सामोरे जावे लागले आहे. पी. व्ही. सिंधू हिचे महिला एकेरीतील, तर एच. एस. प्रणोय याचे पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. ट्रीसा जॉली - गायत्री गोपीचंद ही भारतीय जोडी जागतिक क्रमवारीत ३०व्या स्थानावर आहे. याआधी दक्षिण कोरियन जोडीकडून दोन वेळा भारतीय जोडीला पराभवाचा सामना करावा लागला होता.

ट्रीसा - गायत्री जोडीला त्यांच्याविरुद्ध हा पहिलाच विजय ठरला. बेक हा ना - ली सो ही या जोडीकडून पहिल्या गेममध्ये चुका झाल्या. याचा फायदा भारतीय जोडीने घेतला. १८-९ अशी आघाडी घेत पहिला गेम २१-९ असे जिंकण्यात त्यांना यश मिळाले.

दुसऱ्या गेममध्ये ट्रीसा जॉली - गायत्री गोपीचंद जोडीकडून चूक घडली. त्यामुळे दक्षिण कोरियन जोडीला या लढतीत पुनरागमन करता आले. बेक हा ना - ली सो ही या जोडीने हा गेम २१-१४ असा जिंकत १-१ अशी बरोबरी साधली.

तिसऱ्या गेममध्ये दोन्ही जोड्यांमध्ये ८-८ अशी बरोबरी झाली. ही लढत अटीतटीची होणार, असे वाटू लागले; पण ब्रेकआधी भारतीय जोडीने दोन महत्त्वाचे गुण मिळवले आणि सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. भारतीय जोडीने आक्रमक खेळ करताना १६-९ अशी आघाडी मिळवली. अखेर तिसरा गेम २१-१५ असा जिंकण्यात त्यांनी बाजी मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT