पी व्ही सिंधू sakal
क्रीडा

Singapore Open : भारतीय बॅडमिंटनपटूंना सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी निराशेचा सामना

सिंगापूर ओपन स्पर्धा : सिंधू, साईना, लक्ष्य, प्रणॉयचा पराभव

सकाळ वृत्तसेवा

सिंगापूर : भारतीय बॅडमिंटनपटूंना सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी निराशेचा सामना करावा लागला. पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल, लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय या स्टार खेळाडूंना एकेरी गटाच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांचे आव्हान सलामीलाच संपुष्टात आले.

पी. व्ही. सिंधू हिला क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या जपानच्या अकाने यामागुची हिच्याकडून महिला एकेरीत हार पत्करावी लागली. यामागुची हिने सिंधू हिचे कडवे आव्हान १८-२१, २१-१९, २१-१७ असे मोडून काढले. सिंधूचा एक तास व एक मिनिटात पराभव झाला. सातवी मानांकित रॅचनोक इंतनॉन हिने साईना नेहवालवर २१-१३, २१-१५ अशी मात केली. साईनाकडून कडवा प्रतिकार करण्यात आला नाही. अवघ्या ३३ मिनिटांमध्ये तिचा पराभव झाला. सुपनिदा केटथोंग हिने आकर्षी कश्‍यपवर २१-१७, २१-९ अशी मात केली.

पाचव्या मानांकित चाऊ टीएन चेन याने पुरुषांच्या एकेरीत लक्ष्य सेनचा कडवा संघर्ष १८-२१, २१-१७, २१-१३ असा मोडून काढला. पहिला गेम जिंकल्यानंतरही लक्ष्य याचा पराभव झाला. तिसरा मानांकित कोडाय नाराओका याने एच. एस. प्रणॉय याला २१-१५, २१-१९ असे सरळ गेममध्ये हरवले.

किदांबी, प्रियांशूचा विजय

एकीकडे भारतीय बॅडमिंटनपटूंकडून निराशा झाली असतानाच किदांबी श्रीकांत व प्रियांशू राजवत यांनी पुरुषांच्या एकेरीत विजय मिळवले आणि आगेकूच केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

U19 IND vs U19 AUS: सेहवाग - द्रविडची मुलं आता भारतीय संघात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी युवा संघाची घोषणा

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

SCROLL FOR NEXT