South Africa Announce Test Team Against New Zealand marathi news 
क्रीडा

संघात खळबळ! कोणताही सामना न खेळणाऱ्या खेळाडूला बोर्डाने केला कसोटी कर्णधार

Uncapped Neil Brand named South Africa captain : भारतीय क्रिकेट संघासोबत खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेला.....

Kiran Mahanavar

South Africa Announce Test Team Against New Zealand : भारतीय क्रिकेट संघासोबत खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडविरुद्ध त्याच फॉरमॅटमध्ये खेळायचे आहे.

या संघाला पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये किवी संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यासाठीचा संघ शनिवार 30 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. निवडकर्त्यांनी जो संघ निवडला आहे, तो अतिशय धक्कादायक आहे. असे करण्यामागील कारण म्हणजे कर्णधार नील ब्रँड या मालिकेत पदार्पण करणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जायचे आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शनिवारी संघ जाहीर करण्यात आला. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात 7 नवीन चेहरे आहेत.

सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे ज्या खेळाडूला कर्णधार बनवण्यात आले आहे. तो या दौऱ्यातच कसोटी पदार्पण करणार आहे. म्हणजे एकही सामना न खेळता त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय निवडकर्त्यांनी घेतला आहे.

दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी नील ब्रँडची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. नील ब्रँडने आतापर्यंत आपल्या संघासाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना 4 फेब्रुवारीपासून तर दुसरा कसोटी सामना 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

दक्षिण आफ्रिका संघ : नील ब्रँड (कर्णधार), डेविड बेडिंघम, क्लाइड फॉर्टुइन, जुबैर हमजा, रुआन डी स्वार्ट, शेपो मोरेकी, मिहलाली म्पॉन्गवाना, डुआन ओलिवर, डेन पेटरसन, कीगन पीटरसन, डेन पीट, रेनार्ड वान टोंडर, शॉन वॉन बर्ग, खाया जोंडो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT