SA vs IND
SA vs IND Sakal
क्रीडा

आफ्रिकेच्या कॅप्टनचा 'एल्गार'; तरीही टीम इंडियाला विजयाची संधी

सुशांत जाधव

South Africa vs India, 1st Test, Day 4 : भारत आणि दक्षिण आफ्रिका (SA vs IND) यांच्यातील पहिला कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. चौथ्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेनं चार विकेट्स गमावल्या असून कर्णधार डेन एल्गर (Dean Elgar) संघाचा किल्ला एकाकी लढवत आहे. त्याने अर्धशतक पूर्ण केले असून दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी अजूनही 211 धावांची आवश्यकता आहे. दुसरीकडे भारतीय संघाला (Team India) पहिला कसोटी मालिका जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी अखेरच्या दिवशी 6 विकेट्स घ्यायच्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून कॅप्टन एल्गर एकाकी झुंज देत असला तरी पाचव्या दिवशी भारतीय संघाला सामना जिंकण्याची अधिक संधी आहे.

चौथ्या दिवशी भारतीय संघाचा डाव 174 धावांत आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. मार्करम आणि कर्णधार डेन एल्गर जोडी मैदानात उतरली. मोहम्मद शमीनं (Mohammed Shami) मार्करमला बोल्ड करत टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेच्या धावफलकावर 34 धावा असताना पीटरसेनही 17 धावा करुन माघारी फिरला. मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) त्याला पंतकरवी झेलबाद केले.

रस्सी व्हॅन डेर दुसेन याने 65 चेंडूचा सामना खेळत संयम दाखवला खरा. पण 11 धावांवर बुमराहने (Jasprit Bumrah) त्याची विकेट घेतली. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या केशव महाराजही 8 धावा करुन तंबूत परतला. दिवसाअखेर आफ्रिकेला त्याच्या रुपात चौथा धक्का बसला. दुसऱ्या बाजूला कर्णधार एल्गर 122 चेंडूचा सामना करून 52 धावांवर नाबाद खेळत होता. त्याने आपल्या या खेळीत 52 धावा केल्या.

सेंच्युरियनच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारतीय संघाने 327 धावा केल्या होत्या. या डावात लोकेश राहुल 123 धावा, मयंक अग्रवाल 60 आणि अजिंक्य रहाणेच्या 48 धावांचा समावेश होता. दुसऱ्या डावात पंतच्या 34 धावांची खेळी भारतीय संघाकडून सर्वाधिक होती. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात टेम्बा बवुमानं अर्धशतक झळकावले होते. पाचव्या दिवशी त्याच्यावर आफ्रिका संघाची मदार असेल. कर्णधार एल्गर आणि बवुमाला लवकर बाद करण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला तर भारतीय संघ मालिकेची सुरुवात विजयाने करेल, हे निश्चित. दोन्ही संघासाठी उद्याच्या खेळाचं पहिले सत्र महत्त्वपूर्ण ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT