kho kho  sakal
क्रीडा

Sport News : भारताच्या खो-खो संघात महाराष्ट्राचे चौघे

या मालिकेसाठी महाराष्ट्राच्या चार खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - भारत-मलेशिया यांच्यामध्ये कुमार-मुली अशा दोन्ही विभागांमध्ये खो-खो मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. दोन देशांमधील ही मालिका १२ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे. या मालिकेसाठी महाराष्ट्राच्या चार खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारताच्या कुमार संघात धाराशिवचा किरण वसावे आणि मुंबई उपनगरचा निखिल सोडिये याची निवड करण्यात आली असून भारताच्या मुलींच्या संघात धाराशिवची संपदा मोरे आणि सोलापूरची प्रीती काळे यांना संधी मिळाली आहे.

महाराष्ट्रातील खेळाडूंची कामगिरी

निखिल सोडिये : भारतीय खो-खो महासंघाच्या किशोर/कुमारी राष्ट्रीय स्पर्धेत आणि शालेय राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता. तसेच त्याने पाचव्या ‘खेलो इंडिया’मध्येही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. नरेंद्र कुंदर त्याचे प्रशिक्षक आहेत.

किरण वसावे : भारतीय खो-खो महासंघाच्या राष्ट्रीय स्पर्धेत किशोर गटात दोन वेळेस व कुमार गटात चार वेळेस प्रतिनिधित्व करीत दमदार कामगिरी केली. या स्पर्धेतील वीर अभिमन्यू पुरस्काराचाही तो मानकरी ठरला.

संपदा मोरे : दोन शालेय राष्ट्रीय स्पर्धा, भारतीय खो-खो महासंघाच्या दोन मुलींच्या व एक महिला विभागाची राष्ट्रीय स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा गेम व खेलो इंडिया स्पर्धेत सहभाग. सर्व स्पर्धेत सुवर्ण.

प्रीती काळे : शालेय व भारतीय खो-खो महासंघाच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत नऊ वेळा महाराष्ट्र संघातून प्रतिनिधित्व केले. भारतीय खो-खो महासंघाच्या कुमार राष्ट्रीय स्पर्धेतील जानकी पुरस्काराची मानकरी. ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतही सहभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT