बियांका आंद्रेस्कू  
क्रीडा

बियांकाची फिनिक्‍स भरारी

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : कॅनडाच्या बियांका आंद्रेस्कू हिला दोन आठवड्यांपूर्वी कोणीही फारसे ओळखत नव्हते. गतवर्षी अमेरिकन टेनिस स्पर्धेस पात्रही न ठरलेली 19 वर्षीय बियांका विजेती होईल असे कोणास वाटले नव्हते, पण तिने सेरेना विल्यम्सला अगदी सहज हरवून अमेरिकन टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

टेनिसमधील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धांना बियांका चांगलीच नवीन आहे. तिला विजेतेपदाच्या करंडकाची कोणती बाजू समोर असावी हेही माहिती नव्हते. विजेतेपदाचा स्वीकार केल्यावर या कॅनडाच्या नव्या स्टारला स्पर्धा पदाधिकाऱ्यांनी करंडक कसा धरून उंचावला जातो, हे दाखवले. अर्थात गतवर्षी स्पर्धेस पात्र न ठरलेल्या, यापूर्वी कधीही ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत तिसरी फेरी न खेळलेल्या मुलीकडून काय अपेक्षा बाळगणार.

माझ्या क्षमतेवर माझा कमालीचा विश्‍वास आहे. त्यासाठी मी मेहनत घेत होते. सातत्याने कधीही प्रगती होत नाही. ही प्रगती होत असताना आपण सर्वोत्तम ठरू यासाठी लढत होते. स्वप्नपूर्तीची आशा बाळगून होते. त्याचवेळी क्षमतेचा कसा पुरेपूर उपयोग होईल याकडे लक्ष देत होते, असे वयास असाजेशी परिपक्वता दाखवत बियांकाने सांगितले. या वर्षाच्या सुरुवातीस जागतिक क्रमवारीत 178 वी असलेली बियांका स्पर्धेपूर्वी 15 वी होती.

बियांकाने 6-3, 7-5 बाजी मारत सेरेनाचे सर्वाधिक विजेतेपदाच्या बरोबरीचे स्वप्न लांबवले. सेरेनाच्या ताकदवान खेळास तोडीस तोड प्रत्युत्तर देणाऱ्या बियांकाने चुका कमी केल्या. अंतिम लढतीच्या दडपणासही ती चांगल्या प्रकारे सामोरी गेली. लहानपणी टेनिसचे धडे गिरवताना सेरेना ही बियांकाची आदर्श होती, पण तिच्याविरुद्ध अंतिम लढत खेळताना तिची आक्रमकता कमी झाली नाही. चाहते विरोधात असताना कम ऑन असे ओरडत ती स्वतःला प्रोत्साहित करीत होती. विजेतेपद आवाक्‍यात आल्याचे दडपण तिच्यावर आले आणि तिला 5-1 वरून 5-5 बरोबरी स्वीकारावी लागली, पण तिने विजेतेपद निसटू दिले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT