क्रीडा

SA vs IND : 'क्या मजाक है...', आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर दिग्गज संतापले

Kiran Mahanavar

South Africa beat India Sunil Gavaskar : भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एक डाव आणि 32 धावांनी पराभूत झाला. आजपर्यंत टीम इंडियाला आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. आणि यावेळीही भारताचे हे स्वप्न केवळ स्वप्नच राहिले.

यजमान आफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी हरल्यानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी टीम इंडियावर जोरदार टीका केली. अनुभवी गावसकर म्हणाले की, टीम इंडियाने येथे सराव सामना खेळायला हवा होता. इंट्रा स्क्वॉड मॅचेस हा एक विनोद आहे.

स्टार स्पोर्ट्सवरील संवादादरम्यान सुनील गावसकर यांना टीम इंडियाच्या पराभवाचे मुख्य कारण विचारण्यात आले. या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, याचे साधे कारण म्हणजे तुम्ही येथे कोणताही सराव सामना खेळला नाही. जर तुम्ही थेट टेस्ट मॅच खेळायला आलात तर तीच परिस्थिती होईल.

पुढे गावसकर म्हणाले, होय, तुम्ही भारत अ संघाला नक्कीच पाठवले होते. आणि तो संघ दौर्‍यापूर्वी आला होता. पण येथे आल्यानंतर तुम्हाला सराव सामने खेळावे लागतील. इंट्रा-स्क्वॉड मॅचेस हा एक विनोद आहे, कारण तुमचे वेगवान गोलंदाज त्यांच्याच फलंदाजांना फास्ट बॉलिंग करतील? आपल्या फलंदाजांना दुखापत होण्याची भीती असल्याने ते वेगवान चेंडू टाकत नाहीत. त्यामुळे हा सामना दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध खेळावा लागला. कामाच्या ओझ्याबद्दल बोलू नये.

सेंच्युरियन कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तीन दिवसांत भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 163 धावांची आघाडी घेतली होती. पण प्रत्युत्तरात भारतीय संघ 34.1 षटकात 131 धावा करत दुसऱ्या डावात सर्वबाद झाला. शेवटच्या सत्रात भारताने सात विकेट गमावल्या आणि केवळ 69 धावा जोडल्या. त्यामुळे टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT