KL Rahul esakal
क्रीडा

KL Rahul : भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासातील... सुनिल गावसकरांच केएल राहुलच्या शतकावर मोठं वक्तव्य

अनिरुद्ध संकपाळ

KL Rahul Sunil Gavaskar : भारतीची अवस्था 5 बाद 107 धावा अशी झाली असताना केएल राहुलने दमदार शतकी खेळी करत भारताला 245 धावांपर्यंत पोहचवले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज सोबत महत्वपूर्ण भागीदारी रचली. दरम्यान, केएल राहुलच्या या झुंजार शतकाचे सुनिल गावसकर यांनी तोंडभरून कौतुक केलं.

सुनिल गावसकर हे समालोचन करत असताना म्हणाले की, 'मी गेली 50 वर्षे क्रिकेट पाहतो आहे. मी हे नक्कीच सांगू शकतो की केएल राहुलचे हे शतक भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिल्या सर्वोत्तम 10 शतकांमध्ये मोडतं.

केएल राहुलने आशिया बाहेरचे हे सहावे शतक आहे. मात्र हे शतक भारतासाठी खूप महत्वाचे होते. सेंच्युरियनवर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आग ओकत होते. त्यातच भारताची टॉप ऑर्डर स्वस्तात माघारी गेली होती. मात्र केएल राहुलने हे आव्हान स्विकारत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

केएल राहुलची भारताबाहेर शतके

110 विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी, 2015 मध्ये

108 विरुद्ध श्रीलंका कोलंबो, 2015

किंग्स्टन, 2016 मध्ये 158 वि वेस्ट इंडीज

ओव्हल, 2018 मध्ये इंग्लंड विरुद्ध 149

129 विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स, 2021 मध्ये

123 विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेंच्युरियन, 2021 मध्ये

101 वि दक्षिण आफ्रिका सेंच्युरियन, 2023 मध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT