Sunil Gavaskar esakal
क्रीडा

Sunil Gavaskar : सूर्यकुमारनं असं काहीही मोठं केलेलं नाही... सुनिल गावसकर यांनी कोणाच्या पारड्यात टाकलं आपलं वजन

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Gavaskar : भारतीय संघाने नुकतेच आपली वर्ल्डकपसाठीची टीम फायनल केली. अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे रविचंद्रन अश्विनची शेवटच्या क्षणी संघात वर्णी लागली. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेत भारताच्या मधल्या फळीने चांगल्या धावा करत रोहित शर्माची चिंता मिटवली. मात्र चौथ्या क्रमांकावर कोणाला खेळवायचे हा नवा प्रश्न देखील उपस्थितीत केला.

सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यात चौथ्या क्रमांकासाठी चुरस आहे. दोघांनीही ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत दमदार खेळी केली. मात्र भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनिल गावसकर यांनी मात्र सूर्यकुमारऐवजी श्रेयस अय्यरला संघात प्राथमिकता मिळावी असे मत व्यक्त केले.

सुनिल गावसकर म्हणाले की, 'सूर्यकुमारने वनडे क्रिकेटमध्ये अजून मोठी कामगिरी केलेली नाही. तो शेवटच्या 15 ते 20 षटकात फलंदाजी करतोय आणि त्याचे टी 20 क्रिकेटमधील कौशल्य वापरत धावा करतोय. नक्कीच हे महत्वाचं आहे. मात्र हार्दिक पांड्या, इशान किशन, केएल राहुल हे देखील ही भुमिका चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात.'

'त्यामुळे अय्यर हा चौथ्या क्रमांकावर एकमद फिट आहे. सूर्यकुमार यादवला अजून वाट पहावी लागले. जर सूर्याला चौथ्या क्रमांकावर संधी मिळाली तर त्याला मोठे शंभर करावे लागतील आणि मी देखील मोठ्या खेळी करू शकतो हे दाखवावे लागेल.'

भारताने अक्षर पटेलच्या ऐवजी अनुभवी रविचंद्रन अश्विनला संघात जागा मिळाली आहे. अक्षर पटेलच्या मांडीचा स्नायू दुखावला आहे. त्यामुळे तो लवकर फिट होण्याची शक्यता नाही. त्यानंतर अश्विनला संघात स्थान देण्यात आले. त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दोन वनडे सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Results : सतेज पाटलांच्या विजयामुळे धास्ती? 'गोकुळ'च्या निकालाने महायुती बॅकफूटवर? कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता

अभिनेता धनुष राजकारणात येणार? कोणत्या पक्षात जाणार, संपत्तीची रंगली चर्चा?

Farmer Relief: पाच हजारांची मदत नको, शेतकऱ्यांना भरीव दिलासा हवा!

Sindhudurg ACB Action : वकिलाच्या तक्रारीनंतर ACB ची मोठी कारवाई; 7/12 उताऱ्याच्या नोंदीसाठी 5 हजारांची लाच मागणारा तलाठी अटकेत, रेल्वे ब्रिजजवळ घेतलं ताब्यात

Maharashtra Weather Update : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील हवामान बदलणार; चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज, आठ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT