suryakumar yadav  
क्रीडा

Suryakumar Yadav : 'ते स्वीकारायला मला लाज वाटत नाही...' ODI मधील खराब कामगिरीनंतर सूर्याने सोडलं मौन

वनडेमधील खराब कामगिरीवर सूर्यकुमार अखेर बोललाच!

Kiran Mahanavar

Suryakumar Yadav WI vs IND T20 : सलग दोन टी-20 सामन्यांमधील पराभवानंतर तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव करून मालिका जिंकण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने 17.5 षटकात 3 विकेट गमावत 164 धावा करत शानदार विजय नोंदवला. भारताच्या या विजयाचा हिरो ठरला सूर्यकुमार यादव. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. यादरम्यान त्याने एकदिवसीय क्रिकेटवर मोठे वक्तव्य केले.

सूर्यकुमार यादवने प्लेअर ऑफ द मॅच दरम्यान आपल्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल सांगितले की, माझी एकदिवसीय सामन्यातील कामगिरी खूपच खराब आहे, ते स्वीकारायला मला लाज वाटत नाही कारण प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा आहे. राहुल सर आणि रोहितने मला अधिक सराव करायला आणि परिस्थितीनुसार खेळायला सांगितलं. आता संघासाठी कामगिरी करणे आणि आलेल्या संधींचा पुरेपूर उपयोग करणे हे माझ्यावर अवलंबून आहे.

सूर्यकुमार 44 चेंडूत 83 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार मारले. तिसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी करत सामना उलथवून लावला. त्याचे हे टी-20 कारकिर्दीतील 14 वे अर्धशतक होते.

सूर्यकुमार यादवने तिसर्‍या टी-20 मध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावताच रोहित शर्माच्या पुढे गेला. 51व्या टी-20 सामन्यात सूर्याचा हा 12वा पुरस्कार पटकावला. रोहित शर्माने 148 सामन्यांमध्ये 11 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. भारताकडून टी-20 मध्ये सर्वाधिक वेळा प्लेयर ऑफ द अवॉर्ड जिंकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने 115 सामन्यांत 15 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT