Riyan Parag esakal
क्रीडा

Riyan Parag : माझ्या दर्जाचं इथं... रियान परागचा अर्धशतकी धडाका कायम, विरेंद्र सेहवागलाही टाकलं मागं

अनिरुद्ध संकपाळ

Riyan Parag : भारतातील युवा अष्टपैलू खेळाडू रियान पराग हा आयपीएलमधील आपल्या सुमार कामगिरीमुळे कायम ट्रोल होतो. मात्र राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूने देशांतर्गत स्पर्धेत मोठा कारनामा करत आपली क्षमता दाखवून दिली. रियान परागने सैयद मुश्ताक अली टी 20 क्रिकेट स्पर्धेत धुमाकूळ घातला आहे.

त्याने या स्पर्धेत यापूर्वी कधीही झाली नाही अशी कामगिरी करून दाखवली आहे. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सलग 7 सामन्यात 7 अर्धशतकी खेळी करण्याच पराक्रम रियान परागने केला. त्याने या स्पर्धेत नाबाद 76 धावांची आपली सर्वोत्तम खेळी केली. तर 9 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आहेत. याचबरोबर त्याने विरेंद्र सेहवागचा मोठा विक्रम देखील मोडला.

रियानची सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमधील आतापर्यंतची कामगिरी

आसाम विरूद्ध बंगाल - नाबाद 50 धावा, 23 धावात 2 विकेट्स

आसाम विरूद्ध केरळ - नाबाद 57 धावा, 17 धावात 1 विकेट

आसाम विरूद्ध हिमाचल प्रदेश - 72 धावा, 35 धावात 1 विकेट्स

आसाम विरूद्ध चंदीगड - 76 धावा, 37 धावात 1 विकेट

आसाम विरूद्ध सिक्कीम - नाबाद 53 धावा, 17 धावात 1 विकेट

आसाम विरूद्ध सर्विसेज - नाबाद 76 धावा, 9 धावात 3 विकेट्स

आसाम विरूद्ध बिहार - 61 धावा, 25 धावात 2 विकेट्स

रियान परागने बंगालविरूद्धच्या क्वार्टर फायनल सामन्यात नाबाद 50 धावांची खेळी करत आसामला विजय मिळवून दिला. याचबरोबर आसामने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. बंगालने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 बाद 138 धावांपर्यंत मजल मारली होती.

हे आव्हान आसामने 17 षटकात 2 बाद 142 धावा करत पार केले. रियान सोबतच बिशल रॉयने नाबाद 45 तर सलामीवीर रिशव दासने 31 धावांचे योगदान दिले. रियानने गोलंदाजीत देखील चमक दाखवत 4 षटकात 23 धावात 2 बळी टिपले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील 'आरएसएस स्मृती मंदिरा'बाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले

SCROLL FOR NEXT