Team India Asian Game 
क्रीडा

BCCI News : बीसीसीआयच्या एका घोषणेने 'या' 20 खेळाडूंचे स्वप्न भंगले, वर्ल्ड कप 2023 च्या शर्यतीतून!

Kiran Mahanavar

Team India Asian Games : भारतीय क्रिकेट संघ प्रथमच आशियाई क्रीडा 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडिया 23 सप्टेंबरपासून आशियाई खेळ खेळणार असून त्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला तर 5 खेळाडूंना स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे.

ऋतुराज गायकवाडला या संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका घोषणेने या 20 खेळाडूंचे स्वप्न भंगले आहे. असे मानले जात आहे की 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी हे 20 खेळाडू टीम इंडियामध्ये आपले स्थान निश्चित करण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात ज्यांची नावे आहेत ते वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाहीत. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीचा संघ शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बीसीसीआयचे माजी अधिकारी सबा करीम यांनी संघाच्या घोषणेनंतर लाईव्ह कॉमेंट्री दरम्यान सर्व खेळाडूंची नावे वाचून दाखवली. यादरम्यान, सबा करीमने असेही सांगितले की जो कोणी आशियाई स्पर्धेत खेळेल तो विश्वचषक संघाचा भाग होणार नाही कारण दोन्ही स्पर्धा एकाच वेळी खेळल्या जाणार आहेत.

23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धा खेळल्या जाणार आहेत. त्याचवेळी 5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषक 2023 सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत या 20 खेळाडूंना विश्वचषक संघात स्थान मिळणे कठीण आहे. क्रिकेट आशियाई इतिहासात फक्त तीन वेळा खेळली गेली आहे.

मात्र भारताने या स्पर्धेत एकदाही आपला संघ पाठवला नाही. त्याच वेळी भारतीय क्रिकेट बोर्डाने आधी सांगितले होते की, व्यस्त वेळापत्रकामुळे पुरुष आणि महिला क्रिकेट संघ या मेगा स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. पण बीसीसीआयने आता आपला निर्णय बदलला आहे.

आशियाई खेळांसाठी भारतीय पुरुष संघ :

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभुसिमरन सिंग

स्टँडबाय खेळाडू: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT