Team-India 
क्रीडा

'टीम इंडिया'च्या क्रिकेटपटूवर मैदानातील रोलर चोरीचा आरोप

विराज भागवत

राज्य क्रिकेट संघटनेने केला अष्टपैलू क्रिकेटपटूवर आरोप

नवी दिल्ली: सेलिब्रिटी (Celebrity) आणि वाद (Fights) हा काही नवी गोष्ट नाही. अनेक वेळा अभिनेते (Bollywood Actors) मंडळी किंवा क्रिकेटपटू (Cricketers) वेगवेगळ्या वादात अडकल्याचे दिसू आले आहे. काही वेळा काहींना पोलिस चौकशी (Police Inquiry) आणि शिक्षेलाही सामोरे जावे लागले आहे. पण टीम इंडियाच्या (Team India) एका क्रिकेटपटूवर चक्क मैदानातील रोलर चोरी (Pitch Roller) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर (Jammu & Kashmir) क्रिकेट बोर्डाने भारतीय अष्टपैलू खेळाडू (All Rounder) परवेझ रसूल (Parvez Rasool) याच्यावर हा आरोप केला.

जम्मू आणि काश्मीर असोशिएशनने रसूलवर आरोप केला आहे की JKCA च्या मैदानातील पिच रोलर त्याने चोरी केला. इतकेच नव्हे तर पिच रोलर रसूलने असोशिएशनला परत द्यावा अशी एक नोटीसदेखील त्याला पाठवण्यात आली आहे. मात्र मी रोलर चोरी केलेली नसून माझ्यावर असा आरोप होणे खूपच दुर्दैवी आहे, अशी भावना परवेझ रसूलने व्यक्त केली. रसूल हा जम्मू काश्मीरमधील एक उत्तम क्रिकेटपटू आहे. त्याने भारताकडून १ वन डे आणि १ टी २० सामना खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या खेळाडूवर असा आरोप करणे ही खूपच वाईट बाब असल्याचे त्याने म्हटले आहे.

परवेझ-रसूल

परवेझवर ज्या पद्धतीचे आरोप सध्या करण्यात आले आहेत, त्यामुळे तो चर्चेत आला असून त्याच्या प्रतिमेला धक्का लावणारी ही गोष्ट आहे असे त्याचे मत आहे. संघटनेने त्याला रोलर परत करण्यास सांगितले आहे. जर त्याने रोलर परत केला नाही तर त्याच्याविरोधात पोलिस कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. या मुद्द्यावर भाजपचे प्रवक्ते ब्रिगेडीयर (निवृत्त) अनिल गुप्ता म्हणाले की संघटनेकडे रसूलने रोलर चोरल्याचा काही पुरावा आहे का? असा सवाल त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT