Rohit Sharma SA vs IND 1st Test Playing 11  Esakal
क्रीडा

Sa vs Ind 2nd Test : केपटाऊन कसोटी सामन्यात ही असू शकते भारताची प्लेइंग-11, दोन खेळाडू होणार बाहेर

Kiran Mahanavar

South Africa vs India Playing 11 : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका खेळणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला एक डाव आणि 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता दोन्ही संघ ३ जानेवारीपासून मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघ दोन बदलांसह या सामन्यात खेळू शकतो.

अष्टपैलू रवींद्र जडेजाचे दुसऱ्या कसोटीत खेळणे जवळपास निश्चित झाले आहे. पहिल्या सामन्यात पाठीच्या समस्येमुळे तो प्लेइंग-11 चा भाग नव्हता. मात्र, तो आता तंदुरुस्त असून केपटाऊन कसोटीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या पुनरागमनामुळे अश्विनचे ​​बाहेर होणे निश्चित आहे. पहिल्या सामन्यात जडेजाच्या जागी अश्विनला खेळण्याची संधी मिळाली.

सेंच्युरियनमध्ये पदार्पण कसोटी सामना खेळणारा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा फारसा प्रभावी दिसत नव्हता. पहिल्या कसोटीत कृष्णाने 20 षटकांत 93 धावा दिल्या आणि एका फलंदाजाला बाद केले. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी आवेश खान किंवा मुकेश कुमार या दोघांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमीच्या जागी अवेश खानचा नुकताच संघात समावेश करण्यात आला आहे.

केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणे भारतासाठी मोठे आव्हान असणार आहे. कारण आजपर्यंत भारतीय संघाला विजयाची नोंद करता आलेली नाही. या मैदानावर दोन्ही संघांमध्ये एकूण 6 कसोटी सामने झाले आहेत. यामध्ये यजमान संघाने 4 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. गेल्या दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला या मैदानावर 7 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत, अभिमन्यू कुमारन ईशवा, श्रीकर भारत, आवेश खान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT