Team-India 
क्रीडा

T20 World Cup: फायनलमध्ये भारताविरूद्ध असावा 'हा' संघ- कार्तिक

विराज भागवत

पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया नव्हे तर वेगळ्याच संघाचं घेतलं नाव

T20 World Cup: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतेच टी२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना पाकिस्तानसोबत येणार आहे. २४ ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. त्यानंतर भारताचा ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडशी, ३ नोव्हेंबरला अफगाणिस्तानशी तर पुढील दोन सामने ५ आणि ८ नोव्हेंबरला होणार आहे. भारत-पाकिस्तान हा सामना कायमच मनोरंजक असतो. पण, 'पाकिस्तानपेक्षाही एका वेगळ्याच संघासोबत टीम इंडियाचा अंतिम सामना झाल्यास जास्त मजा येईल', असे मत फलंदाज दिनेश कार्तिकने व्यक्त केले.

"भारतीय संघ टी२० विश्वचषकाच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे यात वादच नाही. पण त्यांच्यासोबत अंतिम फेरीत दुसरा संघ कोणता असावा असं जर मला विचारलं तर मी म्हणेन की भारत-विंडिज फायनल सामना रंगायला हवा. कारण भारतानंतर माझा सर्वात आवडता संघ आहे विंडिज. कारण ते ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतात ती पद्धत आणि शैली मला खूप आवडते. टी२० क्रिकेट हे त्या संघाचं आवडता क्रिकेट प्रकार आहे. टी२० क्रिकेटमध्ये विंडिजचा संघ खूपच चांगला खेळतो. त्यामुळे भारतोसोबत विंडिजचता संघ फायनलच्या सामन्यात खेळावा असं मला वाटतं", असं दिनेश कार्तिक ICCच्या एका मुलाखतीत म्हणाला. विंडिजने स्पर्धा जिंकावी की नाही ते त्यावेळच्या प्रतिस्पर्धी संघावर अवलंबून असेल असेही कार्तिकने स्पष्ट केले.

T20 World Cup स्पर्धा अशी रंगेल...

पात्रता फेरीचे गट -

गट अ: श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, नामिबिया

गट ब: बांगलादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, ओमान

हे सामने झाल्यानंतर Super12 स्टेजचे सामने 23 ऑक्टोबरपासून दुबई येथे सुरु होणार आहेत. दोन्ही गटातील प्रत्येकी अव्वल दोन संघ या फेरीत खेळतील. सलामीच्या लढती या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सकाळी तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये होणार आहेत. सहा-सहा संघाचे दोन ग्रुप Super12 मध्ये खेळतील.

ग्रुप 1 - : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, ए 1, बी 2

ग्रुप 2 - गट 2: भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, बी 1, ए 2

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT