India vs South Africa 2nd Test Marathi news sakal
क्रीडा

Sa vs Ind : पहिला कसोटी सामना झाल्यानंतर बोर्डाने घेतला मोठा निर्णय! अचानक बदलला कर्णधार, 'या' खेळाडूकडे दिली धूरा

Kiran Mahanavar

India vs South Africa 2nd Test : सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला चारी मुंड्या चीत केलं. आणि अवघ्या 3 दिवसांत विजय मिळत खेळ खल्लास केला.

सेंच्युरियन कसोटीत टेंबा बावुमा हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार होता, पण दुखापत झाल्यानंतर त्याने पहिल्याच दिवशी मैदान सोडले, त्यानंतर डीन एल्गरने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली. आता अशी बातमी आहे की डीन एल्गर दुसऱ्या कसोटीतही दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असेल कारण टेम्बा बावुमा कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

कसोटी मालिकेतून बाहेर पडणे म्हणजे बावुमा भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही खेळताना दिसणार नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील शेवटची कसोटी 3 जानेवारी 2024 पासून केपटाऊनमध्ये खेळली जाणार आहे. त्या कसोटीतही एल्गर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असेल.

सेंच्युरियन कसोटीत दुखापतीमुळे टेंबा बावुमाला बाहेर जावे लागले आहे. क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती. दुखापतीनंतर त्याचे स्कॅनिंग करण्यात आले, त्यावेळी परिस्थिती थोडी गंभीर असल्याचे दिसून आले. आणि याच कारणामुळे तो भारताविरुद्धची दुसरी आणि शेवटची कसोटी खेळताना दिसणार नाही. टेम्बा बावुमा बाहेर गेल्यानंतर कर्णधारपद डीन एल्गरकडे सोपवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT