News  sakal
क्रीडा

Tennis News : कतार ओपन स्पर्धेत बोपण्णाला विजेतेपद

ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीमध्ये प्रवेश केला होता.

सकाळ वृत्तसेवा

दोहा : भारताचा दुहेरीमधील अव्वल टेनिस खेळाडू रोहन बोपण्णा याने कतार ओपन टेनिस स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवले आहे. बोपण्णा याने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेन याच्या साथीने २५० गुणांच्या कतार ओपनच्या अंतिम फेरीच्या लढतीत कोन्स्टंट लेस्टिन आणि व्हॅन डी झॅंडश्युल्प या जोडीचा अटीतटीच्या सामन्यात (५)६-७, ६-४ आणि १०-६ असा पराभव केला.

अंतिम सामन्यात बोपण्णा आणि एब्डेन जोडीने पहिला सेट टायब्रेकमध्ये गमावला. दुसऱ्या सेटमध्ये बोपण्णा आणि एब्डेन जोडीने चार वेळा प्रतिस्पर्ध्यांची सर्व्हिस भेदली आणि आघाडी घेत सेट ६-४ असा जिंकला. पहिल्या दोन सेटचा निकाल विभागून लागल्याने सामना टायब्रेकमध्ये खेळविला गेला. टायब्रेकमध्ये बोपण्णा- एब्डेन जोडीने सुरुवातीलाच ४-१ अशी आघाडी घेत कतारस्पर्धेमध्ये विजयाच्या दिशेने वाटचालीला सुरुवात केली. तर पुढे जाऊन त्यांनी टायब्रेक १०-६ असा जिंकला.

रोहन बोपण्णा यंदाच्या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असून, त्याने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीमध्ये प्रवेश केला होता. मात्र सानिया मिर्झा सह खेळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लगला होता. तर रॉटरडॅम येथे झालेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा बोपण्णाला पुरुषांच्या दुहेरीमध्ये अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते. कतारमधील विजेतेपद हे बोपण्णाचे कारकिर्दीतील २३ वे विजेतेपद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! रजत पाटिदारने जिंकला टॉस

Mumbai Water Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! पहिली वॉटर मेट्रो दाखल, प्रवासी सेवेत कधी उतरणार?

बीडमध्ये खळबळ! अंगरक्षकाची बंदूक घेत धमकी दिली, धनंजय देशमुखांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

SCROLL FOR NEXT