Tilak Varma-Dewald Brevis 
क्रीडा

Tilak Varma-Dewald Brevis : दक्षिण आफ्रिकेच्या युवा फलंदाजाचे पदार्पण अन् तिलक वर्मा झाला भावूक, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Kiran Mahanavar

Tilak Varma on Dewald Brevis : भारताचा युवा फलंदाज तिलक वर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिलक त्यांचा मुंबई इंडियन्सचा सहकारी खेळाडू डेवाल्ड ब्रेविस टीव्हीवर त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघ दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पण करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये तिलक डेवाल्ड ब्रेविसचे आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा देताना दिसत आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेविस आणि भारताचा तिलक वर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतात. 30 ऑगस्ट रोजी डर्बन दक्षिण आफ्रिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात डेवाल्ड ब्रेविसला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

सामना सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू हसिम आमलाने युवा डेवाल्ड ब्रेविसला पदार्पण कॅप दिली, तिलक वर्मा टीव्हीवर व्हिडिओ पाहिल्यानंतर भावूक झाले आणि ब्रेविसला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तिलकचा हा व्हिडिओ त्यांच्या आयपीएल टीम मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.

227 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ब्रेविसला पहिल्या सामन्यात केवळ 5 धावा करता आल्या. यादम्यान त्याने 6 चेंडूंचा सामना केला, ज्यात एका चौकाराचाही समावेश नव्हता.

ऑस्ट्रेलियन संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 226 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 15.3 षटकांत 115 धावांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 111 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. ऑस्ट्रेलियाचा नवा टी-20 कर्णधार मिचेल मार्शला 49 चेंडूत नाबाद 92 धावा केल्याबद्दल सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. कर्णधार म्हणून मार्शचा हा पहिलाच सामना होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT