Shubman Gill Tinder esakal
क्रीडा

Shubman Gill : गालावर पडते खळी, त्यावर शतकी खेळी; भाऊ टिंडरवरही डिमांडमध्ये

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill Tinder : शुभमन गिलने न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी 20 सामन्यात 63 चेंडूत नाबाद 126 धावा ठोकल्या. भारताने या शतकी खेळच्या जोरावर 234 धावा केल्या. टी 20 क्रिकेटमध्ये शुभमन गिलने आतापर्यंत एकही अर्धशतकी खेळी केली नव्हती. मात्र त्याने थेट शतकी खेळी केली. ही शतकी खेळी भारताकडून सर्वात मोठी खेळी ठरली.

शुभमन गिलने कसोटी, वनडे आणि आता टी 20 मध्ये देखील शतकी खेळी करत आपण तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये खेळू शकतो हे सिद्ध करून दाखवले. गिल फक्त मैदानावरच दमदार कामगिरी करत नव्हता तर तो प्रेक्षक गॅलरीत देखील दमदार कामगिरी करत होता. तिसऱ्या टी 20 सामन्यादरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियममधील एका युवतीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या युवतीने आपल्या हातात एक फलक घेतला आहे. या फलकावर टिंडर माझं आणि शुभमन गिलचे मॅच घडवून आणा असा मजकूर लिहिला आहे. एका इन्स्टाग्राम अकाऊंटने तर फोटो शेअर करत 'गिलला 10 पैकी 10 गुण देत तुमच्या सारखा 10 पैकी 10 गुण मिळणारा दुसरा मुलगा नाही.' अशी कमेंट केली.

गिल हा टीम इंडियातील एक हँडसमन क्रिकेटर आहे. तो खासकरून युवतींमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्याच्या खेळींपेक्षा जास्त त्याच्या अफेअर आणि लिंकअपच्याच चर्चा सुरू असतात. त्याचे नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरशी जोडले गेले. मात्र गिल सारा तेंडुलकर सोबत नाही तर सारा अली खान सोबत डेटवर गेल्याचे वृत्त मध्यंतरी आले होते.

(Sports Latest News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT