Travis Head WTC Final 2023 
क्रीडा

Travis Head WTC Final 2023 : ट्रॅविस हेडने फक्त भारतीय गोलंदाजांना चोपले नाही तर इतिहासही रचला

अनिरुद्ध संकपाळ

Travis Head WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC Final सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताच्या गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅविस हेडने चांगलेच चोपले.

ट्रॅविस हेडने जवळपास 100 च्या स्ट्राईक रेटने शतकी खेळी केली. त्याने स्टीव्ह स्मिथसोबत चौथ्या विकेटसाठी नाबाद दीडशतकी भागीदारी रचली. हेडने शतकी खेळीसोबतच WTC Final मध्ये इतिहास देखील रचला.

ट्रविस हेडने 65 व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर एक धाव घेत आपले कसोटीतील 6 वे शतक ठोकले. हेडचे हे ऑस्ट्रेलियाबाहेरचे पहिलेच कसोटी शतक ठरले.

हेडचे हे भारताविरूद्धचे पहिलेच शतक आहे. विशेष म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पहिले वहिले शतक ठोकण्याचा विक्रम देखील ट्रॅविस हेडच्याच नावावर झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या WTC Final मध्ये देखील कोणाला शतकी खेळी करता आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT